एक्स्प्लोर
गेल्या दोन वर्षांपासून पीएसआय परीक्षेचा निकालच नाही
MAT च्या निर्णयानुसार एमपीएससीने सर्व निकाल लावले, मात्र पीएसआय 2016, पीएसआय 2017 चा निकाल अजूनही प्रलंबित आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांचे निकाल गेल्या दोन वर्षांपासून समांतर आरक्षणाच्या मुद्यावर प्रलंबित होते. MAT च्या निर्णयानुसार एमपीएससीने सर्व निकाल लावले, मात्र पीएसआय 2016, पीएसआय 2017 चा निकाल अजूनही प्रलंबित आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे चांगलाच मनस्ताप झाला आहे. निकाल प्रलंबित का आहे, याचीही माहिती दिली जात नाही, असा आरोप विद्यार्थी करत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही म्हणावी तितकी चांगली नसते. पुण्यासारख्या शहरात राहण्या-खाण्याचा खर्चही त्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे परीक्षा देऊनही निकाल का प्रलंबित आहे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकाल प्रलंबित राहत असेल आणि आयोगाकडे यासंबंधी वारंवार विचारणा करुनही उत्तर मिळत नसेल तर या विद्यार्थ्यांनी दाद तरी कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात सरकारने लक्ष घालून अजूनपर्यंत हा निकाल का प्रलंबित आहे, याची कारणे शोधावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
राजकारण























