Pune News : पुणे जिल्ह्याची विभागणी करून शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती मान्य आहे का? खासदार कोल्हे म्हणतात....!
पुणे जिल्ह्याची विभागणी करून शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या जीवनमानावावर काही फरक पडणार आहे का? की ही केवळ राजकीय मागणी आहे? असा प्रश्न शिरूरचे खासदार अमोल कोल्हे विचारला आहे.
![Pune News : पुणे जिल्ह्याची विभागणी करून शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती मान्य आहे का? खासदार कोल्हे म्हणतात....! MP amol kolhe reaction on news pune district divide and create news district named shivneri mahesh landge Pune News : पुणे जिल्ह्याची विभागणी करून शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती मान्य आहे का? खासदार कोल्हे म्हणतात....!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/16/124a1ff1f33dfb7268daa42935695b6f1684233574507442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune News : पुणे जिल्ह्याची विभागणी करून, शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या जीवनमानावावर काही फरक पडणार आहे का? की ही केवळ राजकीय मागणी आहे? असा प्रश्न शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनीउपस्थित केला आहे. उलट जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर द्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली. पुणे जिल्ह्याचे विभाजन करावे. लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळं पिंपरी चिंचवडच्या बाजूचा भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा आणि त्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यावर एबीपी माझाशी बोलताना अमोल कोल्हे य़ांनी प्रतिक्रिया दिली आहे.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, जिल्ह्यासाठी खर्ची जाणारा निधी विकासासाठी वापरला जावा. शिवनेरी नावाला विरोध नाही फक्त मागणीमागची व्यवहार्यता तपासायला हवी, असं कोल्हे यांनी सूचित केलं. याआधी बारामती जिल्ह्याची ही मागणी झाली होती, सोबतच शिरूर लोकसभेवर भाजपचा डोळा आहे. त्या अनुषंगाने शिवनेरी जिल्ह्याची मागणी केली जातीये का? याबाबत ही कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे उत्तरं दिली आहेत. ते म्हणाले की, जिल्ह्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सारखा मोठा प्रकल्प आहे. ज्यामुळे जुन्नरचा प्रवासी काही मिनिटांत पुण्यात पोहचू शकेल. हा रेल्वे मार्ग देशातील एकमेव ब्रॉडगेजवर होऊ शकणारा प्रकल्प आहे. यामुळे लोकांच्या जीवनमानात फार फरक पडणार असल्याचं ते म्हणाले त्यासोबतच इंद्रायणी मेडिसीटीची सारखी मागणी आहे. देशात असा प्रकल्प आतापर्यंत कोणत्याही शहरात झाला नाही आहे. त्यामुळे आरोग्याच्या सुविधांबाबत विचार करायला हवा. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना दोन्ही प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली होती. मात्र त्यांनतर सरकार बदललं आणि हे सरकार यांसारख्या प्रकल्पावर काम करताना दिसत नाही आहेत. मात्र याच प्रकल्पामुळे मोठा विकास होणार आहे आणि अनेक लोकांना याचा फायदादेखील होणार आहे, असल्याचं ते म्हणाले.
शिवनेरी नाव ठेऊन उपयोग नाही तर...
डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, शिवनेरी नावाला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र शिवरायांनी केलं काम या सगळ्यांनी पहिलं पाहिजे. शिवरायाचं तत्व हे लोककल्याणकारी राज्य बसवण्याचं होतं, असंही ते म्हणाले. मंत्री नितीन गडकरीबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, नितिन गडकरी म्हणाले होते की नवीन पुणं वसवण्याची वेळ आली आहे. लहान शहरातील लोक पुण्याकडे येत आहे. त्यांच्यामुळे पुणे शहरावर ताण यायला लागला आहे. त्यामुळे सुनियोजित शहराच्या माध्यमातून नवीन शहर वसवणं जास्त महत्वाचं असल्याचंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)