एक्स्प्लोर

MNS Vasant More : "आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत'; स्टेटसमुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत; मनसेत इच्छुकांची गर्दी वाढली?

Vasant More : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे यांच्याकडून आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

पुणे : पुण्यात सगळ्या पक्षाकडून लोकसभेच्या (Pune Political News)निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सगळ्याच पक्षांकडून पक्षबांधणीलादेखील सुरुवात झाली आहे. त्यातच आता मनसेसुद्धा तयारीला लागल्याचं दिसत आहे. मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडून आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जनता दरबार घेत वसंत मोरे हे सतत चर्चेत असतात. 

मोर्चेबांधणी करताना  आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणारं स्टेटस ठेवलं आहे. "आता सगळेच म्हणू लागलेत  पुणे की पसंत मोरे वसंत", अशा शब्दात त्यांनी सोशल मीडियावर स्टेट्स ठेवलं आहे. सध्या पुण्यात मनसेतर्फे लोकसभेसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेत इच्छुकांची संख्या वाढली. 

 साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात रस्सीखेच

पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात अनेकदा रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यात मनसेचे दोन गट पडल्याचं स्पष्ट नसलं तरीही त्यांचे वाद कायम समोर आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरच्या भोंग्यांवर भूमिका घेतली होती. हे भोंगे बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या या निर्णयाला वसंत मोरे यांनी काहीसा विरोध केला होता. त्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आलं होतं आणि त्यानंतर साईनाथ बाबर यांना शहराध्यक्षपद दिलं होतं. तेव्हापासून वसंत मोरे आणि साईनाथ बाबार यांच्यात रस्सीखेच किंवा धुसफूस सुरु असल्याचं दिसून आलं. मनसेच्या अनेक कार्यक्रमातदेखील हे बघायला मिळालं. येत्या काहीच दिवसांत लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठीदेखील दोघांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. 

स्टेटसमुळे खळबळ 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. "कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार." त्यामुळे वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला आहे याची चर्चा रंगली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : दम देऊनही निलेश घायवळचे रिल्स व्हायरल; पुणे पोलिसांच्या आदेशाला "भाई लोकांच्या" कार्यकर्त्यांची केराची टोपली, कोण आहे निलेश घायवळ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला,  4 ठार, 7 जखमी
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावीWalmik Karad CID Inquiry : बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरूWalmik Karad News : आत्मसमर्पणापूर्वी 22 दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला,  4 ठार, 7 जखमी
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Santosh Deshmukh Case : वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश
Ajit Pawar: वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या खास शुभेच्छा
पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांना खास संदेश
Embed widget