एक्स्प्लोर

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने टेम्पो चालवून चार वाहनांना दिली धडक, पुण्यातील हडपसरमध्ये ऐन गर्दीच्या वेळी घडला प्रकार 

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टेम्पो चालवून चार वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला आहे.

Pune Accident News :  पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टेम्पो चालवून चार वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर भागात ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनांची नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांच्या सुचनेला न जुमानता हा टेंपो वेगाने पुढे निघाला

टेम्पो  पॉइंट दरम्यान पोलिसांनी MH 42 AR 4246 या क्रमांकाचा टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सुचनेला न जुमानता हा टेंपो वेगाने पुढे निघाला. यावेळी चार वाहनांना या टेम्पोने धडक दिली. टेम्पो थांबल्यानंतर लोकांनी या 17 वर्षांच्या टेम्पो चालकाला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. त्यानंतर टेम्पोच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगली जिल्ह्यातील कराड तासगाव मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

सांगली जिल्ह्यातील कराड तासगाव मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बस चालक आणि क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबईहून तासगावच्या दिशेने जात असताना  भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटला आणि बस पलटी होऊन रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या दुर्दैवी घटनेत बस चालक आणि क्लीनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच कुंडल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ​कराड तासगाव महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी घोगाव व पलूस हद्दीतील पुलाची रुंदी वाढवण्यात आलेली नाही आणि हे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे.
 
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी-चिक्कोडी रस्त्यावर एक भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाचा वाहनावरील  ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडकून शेतात उलटला. ट्रक उलटून भीषण अपघात झाला असला, तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
राखेने भरलेला हा ट्रक अत्यंत वेगाने हिरेकोडी-चिक्कोडी रस्त्यावरून जात होता. अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याशेजारी असलेल्या वीज खांबावर जाऊन जोरात धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, वीज खांब पूर्णपणे मोडून पडला आणि ट्रक थेट बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाला. वीज खांबाला धडक दिल्याने विद्युतभारीत ताराही खाली पडल्या पण अनर्थ टळला. 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget