एक्स्प्लोर
पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्था शाळेच्या फी वाढीवर ठाम
पुणे : पालकांनी आंदोलन केल्यावर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेची महिलाश्रम शाळा आणि ज्युनियर कॉलेज मात्र आपल्या फी वाढीवर ठाम आहे. शिक्षण शुल्क समितीनंही फी वाढ न करण्याचे निर्देश संस्थेला दिले आहेत.
महर्षी कर्वे शिक्षण संस्थेची महिलाश्रम शाळा आणि ज्युनियर कॉलेजनं 5 वी ते 7 वी विना अनुदानित वर्गांसाठी 96 टक्के, 8 वी ते 10 वी विना अनुदानित वर्गांसाठी 81 टक्के, तर 5 वी ते 10 वी अनुदानित वर्गांसाठी 26 टक्के एवढी फी वाढ घेणारच असा पवित्रा घेतला आहे. या आशयाचं पत्र संस्थेकडून शिक्षण शुल्क समितीला देण्यात आलं आहे. याबाबत सुनावणीची गरज नाही असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा हवाला देत संस्थेनं म्हटलं आहे.
पुण्यातील कष्टकरी, धुणी भांडी करणारे, रिक्षा चालक अशा पालकांची मुलं या शाळेत शिकतात. त्यामुळे त्यांनी शाळेच्या या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement