Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील : आदित्य ठाकरे
राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी देखील केली.
Aaditya Thackeray : पुण्यात राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, पुणे हे मुख्य केंद्र आहे, बाकीची ठिकाणं त्यांना फॉलो करतील अस आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील. स्टार्टअप राज्यात खूप आहेत, आता त्यांना स्केल अप करायचे आहे. राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढला आहे का? असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले की, थ्री व्हील चांगलं चालू आहे.
पुण्यात राज्यातील पहिली पर्यायी इंधन परिषदेचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी देखील केली. त्याचप्रमाणे पुण्यात बनलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या इका इ 9 या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन देखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यायी इंथान कुठले मिळेल याचाही विचार चालू आहे. ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही परिषद असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पुणे हे शहर ऑटोमोबाईलसाठी प्रसिद्ध आहे. पुणेकरांनी इथे यावं इथे त्यांना चांगले पर्याय मिळतील असेही त्यांनी सांगितले.
पेट्रोल, डिझेलपेक्षा इलेक्ट्रिकवर खर्च कमी होतो. पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये सगळा खर्च आता बसेस वर होईल असेही ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात देखील scarpping पॉलिसी काही दिवसात राबवणार आहे. तसेच महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील असेही ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रदर्शनात पर्यायी इंधन विभागातील आघाडीच्या दुचाकी, तीनचाकी, कार आणि बसेस दाखवल्या जात आहेत. टाटा मोटर्स, पियाजिओ, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन, महिंद्रा ग्रुप, कल्याणी ग्रुप, केपीआयटी आणि प्राज इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांनी प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी अनेक कंपन्यानी या प्रदर्शनात आपली नवीन उत्पादने लाँच केली.
महत्त्वाच्या बातम्या: