Dattatray Bharane : महायुती एकत्र लढणार की नाही चर्चा रंगली असतानाच आमदार दत्तात्रय भरणेंकडून सूचक भाष्य
Dattatray Bharane : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गट असणार की नाही? आणि स्वबळावर निवडणूक लढवली जाईल की एकत्रित लढवली जाईल, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
Dattatray Bharane : लोकसभेला (Loksabha Electiom) झालेल्या दारुण परावानंतर महायुतीमध्ये नाराजीचा सूर कायम आहे. महायुतीमधील अजित पवार गटावर विशेष करून भाजपच्या गोटातून सातत्याने टीका केली जात आहे. संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवार गटावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गट असणार की नाही? आणि स्वबळावर निवडणूक लढवली जाईल की एकत्रित लढवली जाईल, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
हर्षवर्धन पाटील आणि आम्ही सध्या बरोबर आहोत
या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला आणि हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा मान्य असेल, अशी प्रतिक्रिया इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही सध्या बरोबर असल्याचे भरणे यांनी सांगितले. आम्ही एकत्र आहोत, मीडियाने आमच्यात उगाच भांडणे लावू नयेत असंही भरणे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच मेदवार असतील असे चित्र आहे. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या सुद्धा या मतदारसंघामधून इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये हा मुद्दा कळीचा राहण्याची शक्यता आहे.
इंदापूर आमदार दत्तात्रय भरणेंना 15 हजारांना गंडवलं
दरम्यान, यावेळी फसवणूक झालेला किस्साही सांगितला. ते म्हणाले की, सध्या चोऱ्या माऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, इमोशनल ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं असे सांगत स्वतः आपण कसे फसले गेलो आहोत याचा किस्सा आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितला. फोनवरून आमचा अपघात झाला आहे, गाडीतील दोन इसम जागीच ठार झाले असून आम्ही देखील जखमी झालो आहोत. आम्हाला उपचारासाठी तातडीने पैसे पाठवा अशी समोरून मागणी होते आणि आपण देखील यांना या संकटातून वाचवण्यासाठी तातडीने मदतीचा हात देतो. मात्र, हे फसवेगिरी करणारे टोळी असल्याचं त्यांनी सांगितलं.
मी फसलो आहे हे मी बाहेर कोणाला सांगितले नाही. मात्र आणखी एका आमदाराला देखील अशाच प्रकारे फसवलं गेलं असल्याचं सांगितल्यानंतर त्यांनी यापासून आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे सांगितले. ही एक फसवणारी पालघर येथील टोळी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. इंदापूरमधील आढावा बैठकी दरम्यान त्यांनी या सूचना दिल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या