नाशिकच्या मयुर पाटीलने तयार केलं अनोखं एअरफिल्टर, फिल्टरमुळे गाडीचं मायलेज वाढण्यात मदत
नाशिकच्या मयुर पाटीलने गाडीचं मायलेज वाढण्यात मदत करणारा अनोखा एअरफिल्टर बनवला आहे.
पुणे : काळाच्या ओघात वाढणारी महागाई आणि आपण सतत त्यावर चर्चा केल्याने महागाई कमी होत नाही हे सत्य आहे. त्यातच पेट्रोल डिझेलच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण काही महागाईवर चर्चा न करता त्यावर मार्ग देखील शोधतात. असाच एक तरुण इंजिनिअर पुण्यात आहे.
नाशिकचा मयुर पाटील हा तरुण पुण्यात इंजिनीरिंग करण्यासाठी आला. स्वतः कमाई करून एक बाईक घेतली पण पेट्रोल इतकं महाग होत आहे बघून तो चिंतेत पडला. यासाठी त्याने असं एक एअर फिल्टर बनवलं जे आपल्या गाडीच मायलेज हे 10 ते 20 किलोमीटर प्रती लिटर वाढवतो. त्याचबरोबर देशात सध्या वायू प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणत वाढत आहे. मात्र मयुरने बनवलेला हा एअर फिल्टर 40 टक्क्यांपर्यंत प्रदूषण देखील कमी करतो.
2015 पासून मयूरने हे एअर फिल्टर बनवायचे काम सुरू केलं आणि अखेर त्यांन 2018 मध्ये हे एअर फिल्टर तयार केलं. हे एअर फिल्टर आपण सगळ्याच गाड्यांमध्ये वापरू शकतो. त्याने बनवलेलं हे एअर फिल्टर वापरून आपण बुलेटसारख्या गाड्यांचं देखील मायलेज वाढवू शकतो. मयुरने पुण्यात त्याचा स्वतःचा स्टार्टअप देखील सुरू केल आहे. या एअर फिल्टरचे वैशिष्ट म्हणजे हे एअर फिल्टर इतरांपेक्षा बरच वेगळं आहे आणि याची किंमत देखील जास्त नाही.
एखादा स्टार्टअप किंवा आपली कंपनी सुरू करताना सगळ्यात मोठी अडचण भांडवलाची असते. पण मयुरने या सगळ्यात मोठ्या संकटावर देखील मात केली आणि त्यातून मार्ग काढत मयूरने केंद्र सरकारच्या अटल इंनोवेशन मिशन चा फायदा घेत आपली स्वतःची कंपनी सुरू केली. मयुरने आपल्या जवळच्या मित्रांची मदत घेत त्याच्या या प्रोडक्टचं पेटंट देखील करून घेतल आहे.
मयुरच्या कंपनीला केंद्र सरकारचे स्टार्टअपचे अनेक पारितोषक देखील भेटले आहेत. नुकतेच मयुरने कर्नाटक सरकारच्या एसटी महामंडळासोबत देखील काम सुरू केलं आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या एसटी महामंडळा सोबत देखील त्याची चर्चा सुरू आहे. मयूरची कंपनी आता चारचाकी वाहनांचे देखील एअर फिल्टर बनवत आहे. एकूणच काय तर गरज ही शोधाची जननी बनते आणि जर मनात आणल तर कुठल्याही अडचणींवर मात करत आपण यशस्वी होऊ शकतो हेच मयुरने जगाला दाखवून दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kalyan: इमारत पुनर्विकासप्रकरणी बांधकाम परवानगीमधील अनियमितता, केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा
- डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी उद्योजकांना भरावा लागणार कर? MIDCकडून प्रस्ताव
- कल्याण शहरातील आदिवासी पाडे असुविधेच्या गर्तेत, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही स्वच्छता गृहाची प्रतीक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha