एक्स्प्लोर

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसाठी उद्योजकांना भरावा लागणार कर? MIDCकडून प्रस्ताव

एमआयडीसीकडून 11 किमी रस्त्याचे काँक्रीटीकरन करण्यात येणार असून त्यासाठी उद्योजकांकडून कर आकारण्याचा प्रस्ताव कामा संघटनेला देण्यात आला आहे. 

ठाणे : डोंबिवली औद्योगिक, निवासी क्षेत्रातील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाला अनेक  वर्षानंतर मुहूर्त मिळाला आहे. एमआयडीसीकडून औद्योगिक क्षेत्रातील 11 किमीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरनाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी उद्योजकांकडून प्रतिवर्षी कर आकारला जाणार  आहे. याबाबतचा प्रस्ताव एमआयडीसीकडून कामा संघटनेकडे पाठवण्यात आला होता. मात्र एमआयडीसीकडून आकारण्यात येणाऱ्या कराला उद्योजकांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता एमआयडीसी काय तोडगा काढते की वर्षानुवर्षे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असलेले रस्ते पुन्हा रखडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डोंबिवली एमआयडीसीत 650 कंपन्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी, रस्ता, सांडपाणी, निस्सारण असे अनेक कर कंपनी चालकांकडून पालिका, एमआयडीसी वसूल करते. कर भरूनही औद्योगिक क्षेत्राला पुरेशा सुविधा मिळत नसल्याने उद्योजक त्रस्त असतानाच आता एमआयडीसी परिसरातील निवासी आणि औद्योगिक विभागातील रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. यातील एमआयडीसी औद्योगिक विभागातील 11 किमी रस्त्याचे 45  कोटी  निधीतून एमआयडीसी करनार तर निवासी विभागातील रस्त्यांचे एमएमआरडीएच्या 57 कोटी निधीतून कल्याण डोंबिवली पालिका काँक्रीटीकरण करणार आहे.  डोंबिवली औद्योगिक भागातील 21   किलोमीटर  पैकी 11 किमी रस्त्याचे 45 कोटी रुपयाच्या निधीतून कॉंक्रीटीकरण केले जाणार असून हा खर्च उद्योजकाकडून प्रती चौरस मीटर 25  रुपये या दराने 17  वर्षे वसूल करण्याचा निर्णय एमआयडीसीने  घेतला आहे. मात्र एमआयडीसीकडून 21 मधील 11  किलोमीटर चे रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित उद्योजकांवर हा भार का? असा सवाल कामा संघटनेने करत उद्योजक उचलण्यास तयार नसल्याचे उद्योजकांनी एमआयडीसीला कळवले आहे. यामुळे आधीच दुरवस्था झालेल्या रस्त्याची कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

डोंबिवली औद्योगिक विभागातील रस्त्याची दुरुस्ती एमआयडीसी करणार आहे. या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी उद्योजकाकडून सर्व्हिस कर वसूल करून त्यातून हा खर्च करण्याच्या अटीवर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अंबरनाथ औद्योगिक विभागातील आणि टीडीसी भागातील कामासाठी कामाला मान्यता दिली असून त्याच धर्तीवर डोंबिवलीत देखील कामाकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

औद्योगिक विभागातील काही रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करून त्याबदल्यात सर्व उद्योजकाच्या माथी 17 वर्षे सर्व्हिस कराचा भुर्दंड उद्योजकांना मान्य नाही. एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील 21 किमी रस्त्याची कामे होत असतील तर ठीक अन्यथा आमचा विरोध आहे असं उद्योजकांनी म्हटलं आहे.

एमआयडीसीने पाठवलेल्या पत्रात 25 रुपये प्रति स्क्वेमी आकारणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. खरंतर रस्त्याचं काम एमआयडीसीने केलं पाहिजे, तेही आमच्याकडून पैसे न घेत. एमआयडीसी कॉंक्रिटीकरण करत आहे पण त्यांचं काही नियोजन नाही. त्यामुळे आम्ही कर भरण्यास नकार असल्याचे पत्र त्यांना पाठवल आहे असं कामा संघटनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रस्ते, पाणी दिवाबत्ती यासाठी उद्योजक नियमित कर भरत असून या सुविधा उद्योजकांना देण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. यामुळे रस्त्याच्या जाचक कर उद्योजक भरणार नाही यावर कामा संघटना ठाम आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Embed widget