एक्स्प्लोर

Pune Election: पुणे पोटनिवडणुकीचा आखाडा; चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक, संजय राऊतांची माहिती

Sanjay Raut on Pune Bypoll Election 2023: चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना इच्छुक, संजय राऊतांची माहिती. तर आम्हाला परंपरा शिकवू नये, मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut on Pune Bypoll Election 2023: सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुण्यातील (Pune News) दोन पोटनिवडणुकांची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच सर्वच राजकीय पक्षांनी दोन्ही जागांसाठी तयारी सुरू केली आहे. दोन्ही जागांची पोटनिवडणूक (Maharashtra By-Election 2023) बिनविरोध करण्यासाठी भाजप (BJP) प्रयत्नशील आहे. तर, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मात्र दोन्ही जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चिंचवडची (Chinchwad By-Election) जागा आहे, ती शिवसेनेनं (Shiv Sena) लढावी, असं आमचं मत आहे. तर, पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत (Kasba Peth By-Election) राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसमध्ये (Congress) निर्णय होईल, असं म्हटलं आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "परंपरा आहे, मात्र अंधेरी पोटनिवडणूक (Andheri By Poll Election)देखील बिनविरोध झाली नाही. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही. पण, नांदेड (Nanded) आणि पंढरपूर (Pandharpur) या दोन्ही निवडणुका झाल्या. दोन्ही ठिकाणी आमदारांच्या जवळच्या नातेवाईकांनी निवडणूक लढवली होती. अंधेरीची पोटनिवडणूक हा अपवाद होता. अंधेरीची (Andheri) निवडणूक मुंबईत (Mumbai News) होती आणि भाजपला जिंकण्याची संधी नव्हती. काल रात्री राष्ट्रवादीचे नेते मातोश्रीवर आले होते. दोन्ही पोटनिवडणुकींसंदर्भात बैठक झाली. यासंदर्भात उद्या पुन्हा बैठक घेत काय निर्णय घ्यायचा याची चर्चा करू. मात्र निवडणूक लढलीच तर जी चिंचवडची जागा आहे, ती शिवसेनेनं लढावी, असं आमचं मत आहे. पुण्यातील कसबा पेठेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये निर्णय होईल. पण चिंचवडची जागा शिवसेनेनं लढावी, अशी चर्चा झाली यासंदर्भातला निर्णय होईल." 

"कालच्या बैठकीत निवडणूक टाळता येईल का? यासंदर्भातही चर्चा झाली. दिवंगत आमदारांच्या घरातले लोकं आहेत, त्यावरही चर्चा झाली. उद्धव ठाकरे स्वतः होते. इतर आमच्या प्रमुख सहकाऱ्यांशी देखील चर्चा झाली. मात्र कालच्या बैठकीत हाच सूर आहे की, निवडणूक लढायला हरकत नाही. जरी आम्ही निवडणुकीतून दूर राहिलो, तरीही ती होणारंच आहे. कारण काही अपक्ष निवडणुकीत उतरतील आणि निवडणूक होईल.", असंही संजय राऊत म्हणाले.  

आम्हाला परंपरा शिकवू नये, संजय राऊतांचा टोला 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपले उमेदवार मागे घ्यावेत आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवावी, असं आवाहन केलंय. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी रोज पायमल्ली होतेय, हे कोणी शिकवू नये. नांदेड आणि पंढरपूरमध्ये ही संस्कृती दिसली नाही, अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणं होती."

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादी आग्रही : जयंत पाटील 

पुण्यातील पोट निवडणुकांबाबत बोलताना काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. मुंबईतील माीतोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक पार पडली. बैठकीनंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.  

कसबा मतदार संघातील (Kasba Peth By-Election) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवड मतदारसंघातील (Chinchwad By-Election) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) या आमदारांचं निधन झाल्याामुळे पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर महाविकास आघाडी तिथं उमेदवार देणार, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होणार की, चुरशीची होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra By-Election 2023: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीची खलबतं; दोन्ही जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget