एक्स्प्लोर
लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा, चोरीच्या उद्देशानं हत्या
लोणावळा : लोणावळ्यात सिंहगड कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे यांच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल अडीच महिन्यांनी या हत्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे. चोरीच्या उद्देशानं ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.
लोणावळ्यात तरुण-तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला
सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते. याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. तसंच तपासाला गती मिळत नसल्यानं सार्थकच्या आईनं आत्मदहनाचा इशाराही दिला होता. यानंतर हत्याकांडाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अखेर या तपासाला यश आलं आहे.
महिन्याभरानंतरही लोणावळा दुहेरी हत्याकांडातील मारेकरी मोकाटच
आरोपीनं चोरीच्या उद्देशानं दारुच्या नशेत ही हत्या केल्याचं कबूल केलं आहे. दरम्यान फरार झालेल्या आरोपीचा तपास पोलिस घेत आहेत.
लोणावळा हत्याकांडाचा घटनाक्रम
1 एप्रिल 2017 - श्रुती लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयाच्या हॉस्टेल मधून बाहेर पडली
2 एप्रिल 2017 - सायंकाळी श्रुती आणि सार्थक लोणावळ्यातील एम्बी व्हॅली रोडवर एका मित्राला दिसले
3 एप्रिल 2017 - दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह भुशी धरणावरील डोंगरात आढळले
4 एप्रिल 2017 - महाविद्यालयातील आणि हॉस्टेलमधील दोघांच्या मित्रांची कसून चौकशी सुरु झाली. दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सार्थकची दुचाकी आणि गॉगल सापडला.
1 मे 2017 - सार्थकचे नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि 20 दिवसात आरोपींना अटक करण्याची मुदत देत, रास्ता रोकोचा इशारा दिला
3 मे 2017 - एका महिना उलटून ही पोलिसांच्या हाती काही न लागल्याने सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिला
6 मे 2017 - तपासासाठी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली
3 जून 2017 - दोन महिन्यानंतर हात रिकामे, रास्ता रोकोच्या भीतीने पोलिसांनी नातेवाईकांना आणखी मुदत वाढ घेतली
11 जून 2017 - एक आरोपी अटक केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली. तर एक फरार झाल्याचं उघड. अटक आरोपी मूळचा लोणावळ्यातला असून दारूच्या नशेत त्याने काहींच्या समोर हत्या केल्याची कबुली दिली. खबऱ्यांकडून ही माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या एका कर्मचारीपर्यंत पोहचली. त्यानुसार 3-4 दिवसापूर्वी त्याला अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह 3 एप्रिलला आयएनएस शिवाजीजवळ मृतदेह सापडले होते
लोणावळ्यात महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृत तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते.
'लोणावळा हत्याकांडाची कसून चौकशी करा'
तरुण अहमदनगरच्या राहुरीचा, तर तरुणी मूळची पुण्याच्या ओतूरची होती.
हे दोघेही रविवारी संध्याकाळपासून गायब होते. मात्र सोमवारी संध्याकाळी लोणावळ्यातल्या आयएनएस शिवाजी समोर आणि भुशी धरणाच्या टेकडीवर या दोघांचे थेट मृतदेहच सापडले.
विवस्त्र करुन तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. तसंच दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या होत्या.
दोन्ही मृतदेहांचे हात-पाय बांधण्यात आले होते. तर अंगावर आणि डोक्यावर जबर जखमा आढळल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement