पुण्यात लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी जोरदार सुरु केली आहे. काँग्रेसनेही महाराष्ट्रात(Congress) कंबर कसली आहे.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी जोरदार सुरु केली आहे. काँग्रेसनेही महाराष्ट्रात(Congress) कंबर कसली आहे. काँग्रेसकडून पुण्यात आज पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाना पटोले यांना पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना नाना पटोले यांनी स्पष्टच शब्दात सांगितलं की, "इच्छूक उमेदरांची यादी मागवली आहे. सर्व्हेही सुरु केला आहे. जो सक्षम असेल त्याला तिकिट दिलं जाईल. " पुणे लोकसभा हा काँग्रेसचा आधीचा गढ होता, पण गेल्या काही दिवसांपासून यावर भाजपची सत्ता आहे. पुण्यात कमबॅक करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. त्यासाठी आज आढावा बैठक घेण्यात आली होती. काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छूक असल्याचं बोललं जातेय.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसची (Congress) पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक पार पडली. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), सुशीलकुमार शिंदेंची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पुण्यातील लोकसभेच्या जागेसाठी आम्ही पक्षाच्या शहर शाखेकडून रितसर नावाची यादी मागवली आहे. त्यातून ज्यांच्याकडे निवडून येण्याची गुणवत्ता असेल त्यांचे नाव निश्चित होईल.
नाना पटोले काय म्हणाले ?
गोविंदगिरी महाराजांनी शिवजी महाराजांची तुलना मोदींशी केली, त्यावर बोलताना नाना पटोले यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांबद्दल इतिहासात सातत्याने छेडछाड केली जाते. अनेकदा आपला इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराज रयतेचे राजे होते, त्यांची तुलना होऊच शकत नाही, असे नाना पटोले म्हणाले.
आज पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकी निमित्ताने पत्रकार परिषद घेण्यात आली, सदर पत्रकार परिषदेला राज्याचे प्रभारी रमेश चेंनिथलाजी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण राज्याचे सह प्रभारी सोनल पटेल, आशिष दुवा, माजी मंत्री आरिफ नसीम खान… pic.twitter.com/L1xSGzmeaT
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 23, 2024
मनोज जरांगे आंदोलनवर काय म्हणाले?
हे सरकारच पाप आहे. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सांगत होते की राज्य सरकारला आरक्षण देण्याचे आधीकार आहेत त्यांनी करावं. आता मराठा समाजाला आरक्षण का देत नाहीत. या सारकारला आरक्षण द्यायचच नाही. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, तरीही आरक्षण का देत नाहीत. हे केवळ आक्षणाच राजकारण करत आहेत. हा प्रश तातडीने सोडवावा, असे नाना पटोले म्हणाले. हे येड्याचं सरकार आहे. मराठा आणि ओबीसी वाद हे निर्माण करत आहेत. राज्यातले सगळे उद्योग हे घेऊन पळाले आहेत,अनेक उद्योगपती आपल्या राज्यात मोठे झाले आणि आता सांगतात की मी गुजराती आहे पण व्यापार करण्यासाठी त्यांना मुंबईत यावच लागेल, असे पटोले म्हणाले.
VIDEO : लोकसभा लढणार का? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट हात जोडले!