Video: तेव्हा धनंजय महाडिक म्हणाले, 'काका माझं ऐकत नाहीत, तिथून वाद सुरू झाला' सतेज पाटलांकडून महाडिक-पाटील वादावर मोठं भाष्य
Satej Patil on Dhananjay Mahadik: कोल्हापूरच्या निकालाच्या चर्चेवर ते मिश्किलपणे म्हणाले की, 'तुम्हारे जीत से ज्यादा हमारे हार की चर्चा है' असं फक्त एकाच ठिकाणी झालं आणि ते म्हणजे कोल्हापूर.

Satej Patil on Dhananjay Mahadik: कोल्हापुरात बहुमत मिळेल अशी मला खात्री होती. परंतु, चार प्रभागाची सवय आमच्या लढणाऱ्यांना आणि मतदारांना देखील नव्हती. प्लॅनिंगमध्ये आमची काही प्रमाणात कमतरता राहिली. कोल्हापूरकरांना काँग्रेस यावी असं वाटत होतं. फक्त त्या चार पॅनेलमध्ये उमेदवार चुकीच्या सिलेक्शनमुळे थोडं आम्ही पाठीमागून राहिलो नाहीतर सत्ता आली असती, अशी कबुली काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काॅफी विथ कौशिकमध्ये दिली. यावेळी सतेज पाटील यांनी राज्याच्या राजकारणासह कोल्हापूर, गोकुळ मुद्यावर भाष्य केलं. निवडणुकीच्या प्रचाराबद्दल ते म्हणाले, 'कोल्हापूर कस्सं तुम्ही म्हणशीला तस्स' या स्लोगनमागे फक्त स्लोगन नव्हती तर या कॅम्पेनमधून आम्ही लोकांकडून जाहीरनामा मागून घेतला. साडे बारा हजार लोकांनी आम्हाला सूचना पाठवल्या.
काका माझं ऐकत नाहीत
महाडिक कुंटुबाशी असलेल्या वादाची सुरुवात कशी झाली यावर सतेज पाटील म्हणाले की, 2014 साली आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून निवडणुकीला सामोर गेलो. पवार साहेबांच्या आदेशावरून तो वाद मिटला होता आणि आम्ही एक दिलानं त्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत केली. ते खासदार झाले आणि ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या भावाला माझ्या विरोधात उभा केलं.त्यावेळी धनंजय महाडिकांनी दिलेल्या कारणाबद्दल पाटील म्हणतात, 'त्यावेळी त्यांचं उत्तर होतं की काका माझं ऐकत नाहीत. तिथून तो वाद सुरू झाला'. सध्याच्या संबंधांवर ते म्हणाले की, आता पॉलिटिकल वाद आहे. मी त्यांना महत्त्व देत नाही, माझा अजेंडा कोल्हापूरच्या विकासाचा आहे. मी टीका करून त्यांना तेवढा टीआरपी द्यायची आवश्यकता नाही. भविष्यात एकत्र येण्याबाबत ते म्हणाले की, आता राजकारणात कधी त्यांची संगत नाही हा निर्णय माझा पक्का आहे.
गोकुळ दूध संघावर काय म्हणाले?
गोकुळमधील संघर्षावर ते म्हणतात, गोकुळमध्ये कोऑपरेटिव्हमध्ये त्यांचं पॅनेल आणि आमचं पॅनेल असा विषय होता. ही संस्था साडेचार लाख शेतकऱ्यांशी निगडित आहे. ही शेतकऱ्यांची संस्था जिवंत राहिली पाहिजे. गोकुळमध्ये शेतकरीभिमुख कारभार झाला पाहिजे, व्यक्तिगत स्वार्थासाठी कारभार नसला पाहिजे. व्यक्तिगत टँकर्स जे चालायचे त्याला आमचा विरोध होता. आम्ही गोकुळ निवडणुकीच्या आधी सांगितलं दोन रुपये जास्त देतो. आता आम्ही 12 रुपये जास्त दिला हे गव्हर्नन्समुळे शक्य झालं.
इतर महत्वाच्या बातम्या























