एक्स्प्लोर
पुणे मेट्रोला ब्रेक, मेट्रोमार्गाच्या नदीपात्रातील बांधकामाला स्थगिती
पुणे : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे मेट्रोचं भूमिपूजन झालं मात्र आता हरित लवादाच्या निर्णयानं पुणे मेट्रोला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण हरित लवादानं वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या नदीपात्रातील बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली आहे.
वनाज ते रामवाडी हा मार्ग 14 किमी लांबीचा आहे. त्यापैकी केवळ डेक्कन ते डेंगळे पुलापर्यंतच्या 1.7 किमीचा मार्ग नदीपात्रातून जातो. मेट्रोमार्ग नदीपात्रातून नेऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्या आणि राज्यसभा खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर, आरती किर्लोस्कर यांनी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांनी नदीपात्रात मेट्रोचं बांधकाम करण्यास स्थगिती दिली आहे. याचिकेची पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाआधीच काँग्रेसने, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतलं. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते यावेळी हजर होते.
संबंधित बातम्या :
मेट्रो भूमिपूजन सोहळ्यात शरद पवारांना बोलू दिलं नाही: अजित पवार
पुणे मेट्रोचं भूमिपूजन, मोदी-पवार पुन्हा एकाच मंचावर
मोदींआधीच काँग्रेसकडून पुणे मेट्रोचं भूमिपूजन संपन्न!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement