पुण्यातील तरुणीची पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट, पोलिसांकडून अटकेची कारवाई; कॉलेजनंही केलं निलंबित
Pune Crime : पुण्यातील तरुणीची पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट, पोलिसांकडून अटकेची कारवाई; कॉलेजनंही केलं निलंबित

Pune Crime : पुण्यात (Pune Crime) वास्तव्यास असलेल्या तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याची तक्रार पुणे (Pune Crime) शहरातील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. शिवाय ही तरुणी पुण्यातील (Pune Crime) ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजनेही तरुणीवर निलंबनाची कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सकल हिंदू समाज या पेजने पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्यातील ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, पोलिसांनी या तरुणीला आता ताब्यात घेतलं आहे. सकल हिंदू समाज यांनी पुण्यात शिकत असलेल्या एका तरुणीने तिच्या सोशल मिडिया हॅण्डल वर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट लिहिली असून "पाकिस्तान जिंदाबाद" घोषणा लिहल्या आहेत, अशी माहिती प्रसिद्ध केली आहे.
दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर तरुणीचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे. याबाबत सकल हिंदू समाजाने कारवाईची मागणी केली होती. यावरून पुण्यातील पोलिस ठाण्यात या तरुणीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी दिली आहे.
पाकिस्तानचे समर्थन करणारा आणि पाकिस्तान जिंदाबाद लिहीलेल्या मेसेज व्हाट्सअप ग्रुपमध्ये टाकल्याबद्दल पुण्यातील 19 वर्षांच्या मुलीला अटक करण्यात आलीय. ही मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेते. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमधे भारताने घेतलेल्या भूमिकेबद्दल आक्षेपार्ह मजकूर तीने पोस्ट केलेल्या मेसेजमध्ये होता.
पुण्यात वास्तव्यास असलेल्या तरुणीकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा?
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सकल हिंदू समाज ने X वर पोस्ट करत दिली या संदर्भात माहिती पुणे पोलिसांकडून तरुणीवर अटकेची कारवाई
सकल हिंदू समाज यांनी पुण्यात शिकत असलेल्या एका तरुणीने तिच्या सोशल मिडिया हॅण्डल वर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट लिहिली असून "पाकिस्तान जिंदाबाद" घोषणा लिहल्या आहेत अशी माहिती प्रसिद्ध केली
या नंतर तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे
याबाबत सकल हिंदू समाजाने कारवाईची मागणी केली आहे
यावरून पुण्यातील पोलिस ठाण्यात या तरुणीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























