एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पुण्यात ऑडी आणि होंडा सिटी कार जाळल्या, घटना CCTVमध्ये कैद
पुण्यातल्या धायरी भागात एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडा सिटी या आलिशान गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.
![पुण्यात ऑडी आणि होंडा सिटी कार जाळल्या, घटना CCTVमध्ये कैद In Pune the Audi and Honda City cars burned latest update पुण्यात ऑडी आणि होंडा सिटी कार जाळल्या, घटना CCTVमध्ये कैद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/30084127/pune-car-fire.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातल्या धायरी भागात एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडा सिटी या आलिशान गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.
या आगीमध्ये दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीवरुन आलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने या गाड्यांना आग लावली.
संबंधित व्यक्तीने आधी गाड्यांवर रॉकेल ओतलं आणि नंतर काडी टाकून या गाड्या पेटवून दिल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस त्याआधारे कार पेटवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, दोन आलिशान कार पेटवून देण्यामागे नेमका कुणाचा हात आहे. तसेच आग का लावण्यात आली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)