एक्स्प्लोर

वडिलांचं उत्पन्न 40 कोटी, तरीही OBC प्रवर्गातून IAS; दिव्यांग प्रमाणपत्रवरही प्रश्न, पूजा खेडकर यांची वादाची मालिका!

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचं स्वतःच उत्पन्न 42 लाख असताना आणि त्यांच्या वडिलांच्या नावे 40 कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीमधून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या?

IAS Trainee Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना 2022 मध्ये  युपीएससी परीक्षेत 821 वी रँक मिळाली. या रँकसह त्यांना आयएएस (IAS) दर्जा मिळणं शक्य नव्हतं, कारण त्यावर्षी ओबीसी कॅटेगरीतून आयएएस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक 434 होती. म्हणजे या विद्यार्थ्यांपेक्षा पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची रँक दुपटीने मागे असूनही त्या आयएएस झाल्या. कारण त्यांनी मल्टिपल डिसायबलिटीज असल्याचा दावा केला होता. मात्र त्याआधी 2019 ला युपीएससीची परीक्षा देताना असा कुठलाही दावा केला नव्हता. विशेष म्हणजे 'कॅट'ने त्यांचा हा दावा फेटाळल्यावरही पूजा खेडकर यांची आयएएससाठी निवड झाली. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांचं स्वतःच उत्पन्न 42 लाख असताना आणि त्यांच्या वडिलांच्या नावे 40 कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीमधून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या? हा प्रश्न विचारला जातोय.  खेडकर कुटुंबाच्या राजकीय लाग्याबांध्यांमध्ये या प्रश्नांची उत्तरं दडली असण्याची शक्यता आहे.  

पूजा खेडकर या आयएएस कशा बनल्या याबाबतचं गूढ वाढत चाललंय .  2019 ला सर्वसाधारण उमेदवार म्हणून परीक्षा देणाऱ्या पूजा खेडेकर युपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण तर झाल्या मात्र त्यांना कमी मार्क्स असल्यामुळं आयएएस चा दर्जा मिळू शकला नाही. मग 2022 ला पूजा यांनी त्यासाठी शक्कल लढवायचं ठरवलं. आपण फिजिकली डिसेबल म्हणजे शारीरिक दृष्ट्या अपंग आहोत असा दावा करत तस सर्टिफिकेट युपीएससी ला सादर केलं.दी पर्सन विथ बेंच मार्क डिसेंबलीटीज हा एक वेगळी कॅटेगरी  यु पी एस सी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये शारीरिक अपंगत्व किती प्रमाणात आहे. यावरून 1, 2, 3, 4, आणि 5 असे प्रकार ठरवण्यात आलेत. पूजा खेडकर यांनी यातील सर्वात खालची म्हणजे टाईप पाचची डिसेबलीटी असल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांना दृष्टिदोष आणि मेंटल इलनेस असल्याचं सर्टिफिकेट सादर केलं. यामुळं यु पी एस सी परीक्षेत 821 क्रमांकाची रँक मिळूनही त्यांना आय ए एस चा दर्जा मिळाला. त्यावर्षी यु पी एस सी च्या यादीत ओ बी सी कॅटेगरीतून आय ए एस झालेल्या शेवटच्या विद्यार्थ्यांची रँक होती 434 . म्हणजे जवळपास दुपटीने मागे असूनही पूजा खेडकर आय ए एस बनण्यात यशस्वी झाल्या, त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय. 

वार्षिक उत्पन्नात तफावत -

पूजा खेडकर यांनी त्यांच्या उत्पन्नाबाबत दिलेल्या माहितीत त्यांची पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी आणि अहमदनगर जिल्यात तीन ठिकाणी जमीन असल्याचं म्हटलंय . या मालमत्तांची एकूण किंमत एक कोटी 93 लाख रुपये असून त्यापासून पूजा यांना 42 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. दुसरीकडे त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक लढवताना त्यांच्या मालमत्तांची एकूण रक्कम चाळीस कोटी असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. त्यामुळं ओ बी सी कॅटेगरीतून सवलत मिळण्यासाठी आवश्यक असलेलं आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा असलेलं सर्टिफिकेट त्यांना कसं मिळालं? हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबद्दल निर्माण झालेल्या शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी अर्थात त्यांची स्वतःवर आणि त्यांच्या वडिलांवर आहे. मात्र दोघेही गप्प आहेत. समोर येऊन स्पष्टीकरण देण्याचं टाळतायत. त्यामुळं  संशय आणखी वाढतोय. पण  हा संशय फक्त खेडकरांबद्दल नाही तर आपल्या देशाच्या प्रशासनाचा कणा मानला जाणाऱ्या युपीएससी बद्दल देखील निर्माण झालाय. युपीएससीकडून या प्रकरणात कसा प्रतिसाद दिला जातोय यावर विश्वासहार्यता अवलंबून असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget