Pooja Khedkar Car: ना पूजा मॅडमची, ना तिच्या आईची; लाल दिव्याची ऑडी कार नेमकी कोणाची? मालकाचे नाव समोर
पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीचा मूळ मालक हे मनोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते.
![Pooja Khedkar Car: ना पूजा मॅडमची, ना तिच्या आईची; लाल दिव्याची ऑडी कार नेमकी कोणाची? मालकाचे नाव समोर IAS Pooja Khedkar her mother Manorama Khedkar Contraversial Audi car owner Name Reveled maharashtra Marathi news Pooja Khedkar Car: ना पूजा मॅडमची, ना तिच्या आईची; लाल दिव्याची ऑडी कार नेमकी कोणाची? मालकाचे नाव समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/12/13996bed2ad71ca16dd26ab3f613628c172077728344289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे. पूजा खेडकर यांची चर्चा मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. अनेक आरोपांमुळे पूजा हा वादग्रस्त ठरल्या आहेत.पण सर्वात अधिक चर्चा झाली ती पूजा खेडकर यांच्या ऑडी कारची सर्वाधिक चर्चा झाली. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला.मात्र ही कार कोणाची याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही. अखेर या ऑडी कार प्रकरणात महत्त्वाती अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर वापरत असलेली कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकरांच्या माजी सहकाऱ्याची होती.
पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीचा मूळ मालक हे मनोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री आहे. डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे.
21 तक्रारींची नोंद, 27 हजार रुपयांचा दंड
पुण्यात नियुक्तीवर असताना पूजा खेडकर या लालदिवा लावलेल्या ऑडीने येत होत्या.पूजा खेडकर ज्या ऑडी कारचा वापर करत होत्या त्या कारवर अनेक दंड (चलान) ठोठावण्यात आले आहेत. पूजा खेडकर वापरत असलेली कार त्यांच्या खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं पोलीस तपासांत निष्पन्न झालं आहे. या कारवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 21 तक्रारींची नोंद आहे. तसेच या कारवर 27 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो अद्याप वसूल केलेला नाही.
पुणे पोलीस कारवाई करणार
पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर "महाराष्ट्र शासन" अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई होणार आहे. खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड सुद्धा आहे. दरम्यान, पुजा खेडकर यांच्यावर कारवाईचे स्वरुप काय असेल, त्यांना आर्थिक दंड होणार की गुन्हा दाखल होणार याबाबतचे चित्र लवकरच पोलिसांकडून स्पष्ट होईल.
Video : कार नेमकी कोणाची?
हे ही वाचा :
Pooja Khedkar Car: पुणे पोलिसांची नोटीस धडकताच वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांच्या बंगल्यातून ऑडी कार जागेवरून गायब
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)