Pune Crime News: धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची हत्या; चारित्र्याच्या संशयावरून झाला होता वाद
पिंपरी-चिंचवडच्या वाकड संकुलात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना वाकड परिसरात मध्यरात्री घडली आहे. एका नऊ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची हत्या केली आहे.
Pune Crime News: पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-chinchwad ) वाकड संकुलात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना वाकड परिसरात मध्यरात्री घडली आहे. एका नऊ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची हत्या केली आहे. रमेश पुजारी असे अटक आरोपीचे नाव आहे. ललिता पुजारी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. आईची हत्या आणि वडिलांना अटक करण्यात आल्याने मुले एकटी पडली आहे.
रमेश दारू प्यायचे आणि मुलांसमोर पत्नी ललिताला मारहाण करायचे. पुजारी दाम्पत्याला तीन मुलं असून त्यांच्यासोबत पाच वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी राहते आणि तिसरी मुलगी वसतिगृहात राहते. रात्री उशिरा पती-पत्नीमध्ये वाद झाला. रमेशला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला आणि त्यांनी तिच्या डोक्यावर जोरात वार केले. ललिता गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टारांनी तिला मृत घोषित केलं आहे.
या घटनेत ललिताचा मृत्यू झाला असून आरोपी रमेश पुजारी याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. जर आईचा जीव गेला आणि वडील तुरुंगात गेले. त्यामुळे तिन्ही मुले पोरकी झाली आहेत. त्यामुळे आता तिन्हीमुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. संपुर्ण घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
या पुर्वीदेखील अशीच घटना घडली होती. उच्चशिक्षित तरुणाने पत्नीचा गळा आवळून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली होती. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित होते. अनेक दिवसांपासून आरोपी पत्नीला मारहाण करायचा याच वादातून पत्नीचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.
शिवम पचौरी असं आरोपीचं नाव होत. अवंतिका शर्मा असं खुन झालेल्या महिलेचं नाव होतं. शिवम पचौरीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली होती. दोघांना तीन वर्षांची मुलगी आहे, मद्यपान केलेल्या शिवम ने अवंतीकाच डोकं भिंतीवर, किचनवर आपटून गळा आवळत खून केलाय, यानंतर स्वतः पोलीस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती दिली, तीन वर्षीय चिमुकली समोरच आईचा वडिलाने गळा आवळला. आरोपी शिवम हा आयटी कंपनीत काम करायचा. सध्या तो बेरोजगार होता.