एक्स्प्लोर
चिमुकल्यासह पत्नीचा गळा घोटला, पती दत्ताच्या 'प्रेमलीला'
दत्ताच्या ओळखीतील अन्य एका महिलेला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांच्या फिरकी प्रश्नातून दोन्ही महिला अवाक् झाल्या. कारण या दोघींना ही त्या दत्ताच्या प्रेमात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं.
पिंपरी चिंचवड : बाईचा नाद पुरुषाला कोणत्या थरापर्यंत पोहचवू शकतो, हे पिंपरी चिंचवडमधील घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. प्रेयसी सोनाली जावळेशी विवाह करण्यासाठी दत्ता भोंडवेने आठ महिन्याच्या चिमुकल्यासह पत्नीचा गळा घोटला. या संतापजनक घटनेनं दत्ताचा 'बाईनाद' देखील चव्हाट्यावर आलाय.
दिसायला गोरा-गुमटा अन् शांत डोक्याच्या दत्ताने अनेक महिलांना भुरळ घातली. पत्नी अश्विनी सोबतही त्याने प्रेम विवाहच केला होता. तिच्यापासून तीन वर्षाची एक मुलगी अन् आठ महिन्याचा चिमुकला अनुज अशी दोन अपत्य झाली. लग्नापूर्वीपासूनच 'बाईचा नाद' असल्याने साहजिकच त्याला पत्नी अश्विनीचा कंटाळा आला असेल. त्यातच हिंजवडी येथील खाजगी कंपनीत सुपरव्हायजरचे काम करता करता सोनाली जावळे दिसली.
एका शाळेत क्लार्कपदी असणारी सोनालीला देखील त्याने प्रेमाच्या जाळ्यात खेचले. प्रकरण लग्नापर्यंत पोहचल्याने, आधी पत्नी अश्विनीचा काटा काढायचं ठरलं. यासाठी दत्ता आणि प्रेयसी सोनालीने मित्रांनाच प्रत्येकी पन्नास हजाराची सुपारी दिली आणि पत्नीसह चिमुकल्या अनुजचा गळा घोटण्यात आला.
सुरुवातीला लुटमारीचा रचलेला हा बनाव पोलीसी खाक्या दाखवताच उघड झाला. बरं हा तपास करतानाच दत्ताच्या ओळखीतील अन्य एका महिलेला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले. पोलिसांच्या फिरकी प्रश्नातून दोन्ही महिला अवाक् झाल्या. कारण या दोघींना ही त्या दत्ताच्या प्रेमात असल्याचं तेव्हाच लक्षात आलं.
दत्ताचे एका पाठोपाठ असे 'प्रेमचाळे' पोलिसांसमोर येऊ लागले. दत्ताच्या 'प्रेमलीला' इथेच थांबल्या नाहीत. तर या महाभागाने एका प्रेयसीचा ठरलेला विवाह देखील मोडलाय. लग्न ठरल्यानंतर त्या प्रेयसीने दत्तासोबत संपर्कात न राहण्याचा सूचना दिल्या. पण त्या प्रेयसीकडून दत्ताने लग्न ठरलेल्या मुलाची माहिती घेतली अन् विवाहात घोळ घातला. बारा तासाच्या तपासात दत्ताची चार प्रेम प्रकरण समोर आली. तर पुढील चौकशीत आणखी 'प्रेमलीला' समोर येणार असल्याचे भाकीत पोलिसांनी दर्शवले आहे. एकूणच काय तर बाईचा नाद काय-काय घडवू शकतो, यासाठी हे जिवंत उदाहरण पुरेस आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement