एक्स्प्लोर

पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण; मुंबई पुणे महामार्गावर गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना भरधाव कारनं उडवलं, एका पोलिसाचा मृत्यू

Pune Hit and Run: पुण्यात मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

Pune Hit and Run: पुणे : पुण्यातील (Pune News) पोर्शे हिट अँड रन (Porshe Hit And Run Case) प्रकरणानंतर पुन्हा एका हिट अँड रनच्या प्रकरणानं सगळीकडे खळबळ माजली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बापोडीजवळ अज्ञात वाहनानं दोन पोलिसांना चिरडलं. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात मध्यरात्री झालेल्या हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री साधारणतः पावणे दोन वाजता हा अपघात घडला. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना, समोरून वेगानं आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान कोळी असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर, पी. सी. शिंदे असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रविवारी मध्यरात्री साधन कोळी आणि पीसी शिंदे हे बीट मार्शल म्हणून गस्त घालत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली.

एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू 

पुण्यात मध्यरात्री झालेला अपघात एवढा भीषण होता की, समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले दुसरे पोलीस कर्मचारी शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी पोलीस शिपाई शिंदे यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. साधन कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पुण्यात काल रात्रीत दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पोलीस कर्मचारी दगावले 

पुण्यातील हिट अँड रनच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा मृत्यू झाला आहे. तर, एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. पहिला अपघात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावणे दोन वाजता झालाय. खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनानं त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. या अपघातात समाधान कोळी या पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तर पीसी शिंदे हे पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. या दोघांना धडक देणारी पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार होती, असं पोलिसांच म्हणणं आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून पोलीस या वाहनचालकाचा शोध घेत आहेत. तर दुसऱ्या प्रकरणात पुण्यातील सीआयडीमध्ये काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. गणेश शिंदे हे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागातून दुचाकीवरुन निघाले असताना आज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांना काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Embed widget