Hinjewadi Heavy Rain: हिंजवडीचं पुन्हा वॉटर पार्क झालं; रात्रीची परिस्थिती आवाक्यात, सकाळी मार्ग खुला, पावसाळ्यापूर्वीच्या कामात प्रशासन अपात्र
Hinjewadi Heavy Rain: पावसाने विश्रांती घेताचं पाणी ओसरले आणि सकाळी मार्ग ही खुला झाला. रात्री मात्र या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं होतं.

हिंजवडी: हिंजवडीचं आयटी पार्क (Hinjewadi Heavy Rain) काल (शुक्रवारी,ता, 13) रात्री पुन्हा एकदा वॉटर पार्क झालं होतं. पण गेल्या आठवड्याभरात नालेसफाई झाल्यानं, रात्रीची परिस्थिती आवाक्या बाहेर गेली नव्हती. पावसाने विश्रांती घेताचं पाणी ओसरले आणि सकाळी मार्ग ही खुला झाला. रात्री मात्र या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं होतं. गेल्या शनिवारी हेचं पाणी कंबरेइतकं होतं. त्यानंतर प्रशासनावर चहुबाजूंनी टीका झाली आणि आठवड्याभरात नालेसफाई (Hinjewadi Heavy Rain) करण्यात आली. त्यानंतर कालच्या पावसाने किमान परिस्थिती हाताबाहेर तरी गेली नव्हती. मात्र अद्याप ही पाणी साचत असल्यानं नालेसफाई अथवा पावसाळ्यापूर्वीच्या कामात प्रशासन पुर्णतः पास झालं नाही, हे यातून स्पष्ट झालेलं आहे.(Hinjewadi Heavy Rain)
हिंजवडी आयटी पार्क परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या अवघ्या तासाभराच्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा रस्ते जलमय झाले होती, यावेळी देखील वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. फेज 1 आणि फेज 2 परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना रात्री घरी परतताना मोठा त्रास सहन करावा लागला. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक दुचाकी व चारचाकी वाहने पाण्यात अडकली. काही ठिकाणी पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत पोहोचली होती.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या एका तासात पडलेल्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. गेल्या आठवड्यातही याच परिसरात पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
ओढ्यात चार ते पाच वाहनं वाहून गेली
पिंपरी चिंचवडमधील ओढ्यात चार ते पाच वाहनं वाहून गेली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. संध्याकाळपासून टप्याटप्याने तुफान पाऊस पडला, परिणामी चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहू लागला. यात रस्त्यावरील चार ते पाच वाहनं वाहत आली. अग्निशमन दलाने क्रेनच्या साह्याने ही वाहनं बाहेर काढण्यात आली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. पिंपरी-चिंचवड भागात 46 मिमी, तर शिवाजीनगर भागात 26.5 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी(15 जून) साठी पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रेड अलर्ट:
मुंबई, रायगड – 14
सिंधुदुर्ग – 15
ऑरेंज अलर्ट:
पालघर – 15
ठाणे – 14, 15
रायगड – 15, 16, 17
रत्नागिरी – 15, 16, 17
सिंधुदुर्ग – 14, 16, 17
पुणे – 14
पुणे घाट – 14, 15, 17
कोल्हापूर घाट – June 14, 15, 16, 17
सातारा – June 14, 16, 17



















