एक्स्प्लोर
Fake Acid Attack: वडिलांनीच रचला मुलीवरील हल्ल्याचा बनाव, पोलीस तपासात कट उघड Special Report
दिल्लीतील ऍसिड हल्ल्याच्या नाट्यमय घटनेला एक धक्कादायक वळण मिळाले आहे, ज्यामध्ये विद्यार्थिनीचे वडील अखिल खान (Akil Khan) यांनीच हा कट रचल्याचे उघड झाले आहे. जुना वाद आणि सूड घेण्यासाठी तीन तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने हा बनाव रचल्याची कबुली अखिल खान यांनी पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. पीडित मुलीच्या वडिलांविरोधात जितेंद्र नावाच्या व्यक्तीच्या पत्नीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि याच रागातून वडिलांनी आपल्या मुलीच्या मदतीने हा कट रचला. या हल्ल्यात ऍसिड नसून टॉयलेट क्लीनरचा वापर करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या प्रकरणी वडील अखिल खान यांना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी कठोर कलमे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















