एक्स्प्लोर
Vaijapur Engagement : लंडनचा वर, वैजापूरची वधू, ऑनलाईन साखरपुडा! Special Report
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि लंडन या दोन शहरांमधील अंतर तंत्रज्ञानाने मिटवले आहे. वैजापूरमधील तरुणी आणि लंडनमध्ये नोकरी करणारा तरुण यांचा साखरपुडा चक्क व्हिडिओ कॉलद्वारे संपन्न झाला. 'मला आता सुट्टी नाही भेटणार,' असे वराने सांगितल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी या अनोख्या सोहळ्याला होकार दिला. या ऑनलाइन साखरपुड्यात पारंपरिक मंगलाष्टके आणि विधी पार पडले, फक्त वर आणि वधू दोन वेगवेगळ्या देशांत स्क्रीनद्वारे एकमेकांना जोडले गेले होते. या सोहळ्याने दाखवून दिले की नात्यांमधील ओढ आणि भावना कोणत्याही भौतिक अंतरापेक्षा मोठ्या असतात आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आज अशक्यही शक्य होत आहे. हा अनोखा साखरपुडा सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
















