एक्स्प्लोर
हायकोर्टाने दीपक मानकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
दीपक मानकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालय फेटाळून लावलाय. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
मुंबई : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालय फेटाळून लावलाय. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी या याचिकेवर युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर बुधवारपर्यंत हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. यापूर्वी हायकोर्टाच्या तीन खंडपीठांनी दीपक मानकरच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दिपक मानकर यांचं नाव चर्चेत आलं होतं. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाच जणांच्या नावाचा उल्लेख करत त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं होतं.
या पाच जणांत दिपक मानकर यांच्याही नावाचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. आता हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अखेरचा पर्याय अजूनही मानकरांकडे शिल्लक आहे.
संबंधित बातमी :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement