Prakash Abitkar: 'दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात अन् आमची अडचण होते', आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर पुण्यात नेमकं काय म्हणाले?
Prakash Abitkar: अजित पवारांना कामाची पध्दत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर तिथेच रिऍक्ट होतात असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात म्हणत आबिटकरांनी कौतुक केलं आहे.

पुणे: पुण्यात आज आरोग्य भवनच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन 20 रुग्णालयाचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते, यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अजित पवारांचं कौतुक करत त्यांच्या वक्त होण्याच्या शैलीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या कामाची पध्दत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही त्यावर तिथेच रिऍक्ट होतात असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात म्हणत कौतुक केलं आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर पुढे बोलताना म्हणाले, आजही दादांनी परीक्षा घेतली की, सकाळी आठ वाजता ते आले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते. राज्याची आरोग्य यंत्रणा आम्हाला सुधारायची आहे. पुणे हे आरोग्य विभागाचं दुसर सेंटर आहे. अनेक योजनाची अंमलबजावणी पुण्यातून होते. कामकाज होत होतं, पण एकत्रित कार्यालय नसल्याने अडचणी येत होत्या, म्हणून हे नवं भवन आज उभारत आहोत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे 43 रुग्णालये सुरू करत आहोत.
पुण्यात 7 दवाखान्यांचे उद्घाटन आपण करत आहोत. अकोल्यात 1, अमरावती 4, कोल्हापूर 10, नाशिक 4, ठाणे 13 अशा रुग्णालयाचे उद्घाटन आपण आज करत आहोत. आरोग्य विभागाच काम गतिशील करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आरोग्य विभागात सगळी कामे जलदगतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. अजितदादा एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडली नसेल तर तुम्ही कुठलाही विचार न करता समोर कोण आहे न बघता तिथेच रिऍक्ट होता असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात, असंही आबिटकरांनी बोलताना म्हटलं.
सगळ्या रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचे काम देखील आम्ही करत आहोत. लवकरच राज्यातली सगळ्या सरकारी रुग्णालयात स्वच्छतेची सेवा उपलब्ध करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं जे अधिकारी स्वच्छता ठेवणार नाही, त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू कारण आपण एवढे पैसे खर्च करत आहोत, या टेंडरसाठी ते पैसे योग्य मार्गाने वापरले पाहिजे असंही आबिटकरांनी म्हटलं आहे. चांगली औषधे पुरविण्याचं काम आम्ही करत आहोत. जे औषधे खाजगी दवाखान्यात मिळतील तेच सरकारी दवाखान्यात देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आरोग्याच्या सगळ्या सुविधा एका छताखाली आणायचे काम सुरू
या कार्यक्रमावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, राज्यातील जनतेला जलद पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणे काम आहे. आज जागतिक मलेरिया दिनही आहे. या इमारतीला 73 कोटी रुपये दिले आहेत. 400 दिवसात काम साधारण करायचे आहे, सांगलीच्या एका कन्स्ट्रक्शनला काम दिलं आहे. ससूनला पण हवा तो निधी दिला जातोय, पुण्यात अनेक विभागाच्या भवन काम सुरू आहे, प्रशासकीय इमारती कमी आहेत, म्हणून अनेक ठिकाणी काम सुरू आहे, पोलिस आयुक्तालय काम सुरू आहे. 193 कोटी रुपयाचे पोलिस आयुक्तालय काम सुरू आहे. 62 कोटीचं एसपी कार्यालय काम सुरू आहे. नागरिक जेव्हा जातील तेव्हा सुविधा उपलब्ध मिळाल्या पाहिजेत,आणि यातून नागरिक प्रश्न सुटले पाहिजेत.
800 कोटी रुपये खर्च करून मसुरी यशदा कार्यालय उभा करत आहे. राज्य सरकारची कुठलीही कार्यालय मला भांडे तत्वावर ठेवायची नाहीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनतेची उत्तम प्रकारे सोय करणारे काम आहेत, महायुती सरकार करत आहेत. येणाऱ्या दोन-तीन वर्षात या सगळ्या इमारती काम पूर्ण झाले पाहिजे. मला सरकारी कार्यालय चांगल्या करण्याची आवड आहे. येणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे, पार्किंग प्रश्न यक्ष आहे,आता करत असलेल्या इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था केली जात आहे.
जेवढ्या सरकारी इमारती होतील त्याच्यावर सोलर पॅनल बसवले जाणार आहे. कशी वीज तयार करता येईल याचा विचार सुरू आहे.
आरोग्याच्या सगळ्या सुविधा एका छताखाली आणायचे काम सुरू आहे, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.























