एक्स्प्लोर

Guillain Barre Syndrome: जीबीएसमुळे चिंता वाढली! दुसरीकडे आळंदीतील इंद्रायणी नदी फेसाळली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Guillain Barre Syndrome: पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असताना इंद्रायणी नदी मधील पाणी फेसाळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पुणे: राज्यभरात एकीकडे  गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) च्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे ज्या भागात जास्त प्रमाणात रूग्ण आढळून येत आहेत. त्या भागातील पाण्याची तपासणी केली जात आहे, अनेक भागात दुषित पाणी आढळून येत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीबीएस(Guillain Barre Syndrome) चे रुग्ण आढळून येत असताना इंद्रायणी नदी मधील पाणी फेसाळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome)च सावट असतानाच लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले आळंदी मधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदी ही वारंवार फेसाळत आहे. इंद्रायणी नदी फेसाळल्यामुळे आळंदीतील नागरिक आणि वारकऱ्यांच्या जीवाची खेळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड मधील अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्या ह्या इंद्रायणी नदीत रसायन युक्त पाणी सोडतात आणि नदी प्रदूषित करतात मात्र किरकोळ कारवाई करून संबंधित कंपन्यांना अभय दिले जाते आहे. त्यामुळे असे पाणी नदीत सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

राज्यातील जीबीएस रूग्णांची संख्या 140 वरती

राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही आता 140 वरती पोहचली आहे. यापैकी 78 रुग्ण पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित 26 रुग्ण पुणे महापालिका, 15 पिंपरी-चिंचवड महापालिका, 10 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या 11 आहे. एकूण रुग्णांपैकी 45 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, तर 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत 25 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर मृतांची संख्या पाचवरती पोहोचली आहे. 

सहा वर्षाच्या मुलाची जीबीएसवर यशस्वीरित्या मात

पिंपरी-चिंचवडमधील सहा वर्षीय मुलाला काही दिवसांपासून त्रास होऊ लागला होता. त्याला पेन्सिल देखील हातात पकडता येत नव्हती. बाहेर खाल्ल्यामुळे त्याला जुलाबाचा त्रास झाला आणि तापही आला. दोन-तीन दिवसानंतर तो अंथरुणातून उठून शौचास जाताना देखील धडपडू लागला. त्यानंतर 14 जानेवारी रोजी आपल्या लहान भावासोबत खेळत असताना तो खाली पडला आणि त्याला पुन्हा उठून उभं देखील राहता येत नव्हते. त्याला तातडीने औंध मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे निदान झाले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी आता त्याने जीबीएसवर यशस्वी मात केली आहे. तो आता पुर्णपणे बरा झाला आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Chhota Varkari : 'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget