एक्स्प्लोर
FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर

पुणे : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन पुण्यातील एफटीआयआयचे माजी संचालक प्रशांत पाठारे यांना धमकीचं पत्र आलं आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
धमकीच्या पत्रासोबत एक पार्सलही पाठवण्यात आलं आहे. पार्सलमध्ये डिटोनेटर आणि स्फोटकासारखी पावडर असून, त्या पार्सलवर दिल्लीचा पत्ता आहे. हे पत्र एफटीआयआयच्या कार्यालयात आलं असून, त्यावर माजी संचालक प्रशांत पाठारे यांचं नाव आहे.
“कन्हैयाला पाठिंबा दिल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि कन्हैया कुमारला एफटीआयआयमध्ये येण्यास मनाई करावी”, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पार्सलमध्ये डिटोनेटर आणि स्फोटकासारखी पावडर आढळल्यानं बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केल्यानंतर हे पार्सल पोलिसांकडे देण्यात आलं आहे. हे धमकीचे पत्र नेमके कोणी पाठवलं आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
