एक्स्प्लोर

Pune Auto Rickshaw Fare Hike: पुण्यात प्रवाशांच्या खिशाला झळ, रिक्षा भाडेदरात चार रुपयांची वाढ

Pune Auto Rickshaw Fare Hike: पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत.

Pune Auto Rickshaw Fare Hike: पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील नुकतेच आदेश काढले आहेत. यानुसार रिक्षा चालकांना आता चार रुपयांनी भाडे वाढ करता येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रिक्षा चालकांना ही भाडे वाढ येत्या 1 सप्टेंबरपासून लागू होणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना 25 रुपये आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आकारता येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालकांना पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी 21 रुपये भाडे आकारणी करता येत होती. तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 14 रुपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते. दरम्यान 1 सप्टेंबर पासून मीटर पुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षा धारकांकरिता भाडेसुधारणा लागू राहील. मीटर पुनः प्रमाणीकरणकरण्याची मुदत 31 ऑक्टोंबर पर्यंत आहे. जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण (Meter Calibration) करून घेणार नाहीत त्यांच्यावर 1 ते 40 दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल किंवा किमान 50 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांनीही केली भाडेदरात वाढ करण्याची मागणी 

मुंबईतील टॅक्सी चालक (Mumbai Taxi)  आणि ऑटोरिक्षा चालक यांनी देखील भाडेदरात वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे हे 25 रुपये इतके आहे. त्यात 10 रुपयांची वाढ करून ते 35 रुपये इतके करावे, अशी टॅक्सी युनियनने मागणी केली आहे. असं न केल्यास टॅक्सी चालक (Mumbai Taxi)  आणि ऑटोरिक्षा चालक 15 सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रिक्षा टॅक्सी युनियन आणि सरकारमध्ये यासंदर्भात वारंवार बैठका झाल्या आहेत. मात्र सरकार आश्वासन देते, तोडगा काहीच नाही, म्हणून यावेळी आंदोलन करणारच असा इशारा रिक्षा टॅक्सी युनियनने दिला आहे. यामुळे यावरच लवकरच सरकारने तोडगा न काढल्यास  15 सप्टेबरपासून सामान्य मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.  

इतर महत्वाची बातमी: 

Mumbai Taxi : मुंबईतील टॅक्सी चालकांचा संपाचा इशारा, किमान प्रवासी भाडे 25 वरुन 35 रुपये करण्याची मागणी

 

महत्त्वाच्या बातम्या

Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Embed widget