एक्स्प्लोर

Pune Roof Top Hotel : पुण्यातील बेकायदेशीर रुफटॉप हॉटेलवर कारवाई नसल्याने आगीच्या घटना; कारवाई कधी होणार?

पुण्यातील लुल्ला नगर परिसरात काल (1 नोव्हेंबर) सातव्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला भीषण आग लागली त्यानंतर बेकायदेशीर चालणाऱ्या रुफ टॉप हॉटेलवर कारवाई होत नसल्याचं समोर आलं.

Pune Roof Top Hotel :  पुण्यातील  (pune)  रुफटॉप हॉटेलवर (Roof top hotel)  कारवाई होत नसल्याने आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील लुल्ला नगर परिसरात काल (1 नोव्हेंबर) सातव्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला भीषण आग लागली त्यानंतर बेकायदेशीर चालणाऱ्या रुफ टॉप हॉटेलवर कारवाई होत नसल्याचं समोर आलं. महापालिकेकडून रुफ टॉप हॉटेलवर कारवाई केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्ष अनेक हॉटेल्स अजूनही सुरु असल्याचं चित्र आहे.

82 रुप टॉप हॉटेलला पालिकेकडून नोटिसा

पुण्यातील एकूण 82 रुप टॉप हॉटेलला पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे. त्यातील आतापर्यंत 39 हॉटेलांवर महापालिकेने कारवाई केली आहे. बाकी हॉटेलवर महापालिकेने अजूनही कारवाई केली नाही आहे. बेकायदेशीर चालणाऱ्या या हॉटेलवर अनेकदा आगीच्या घटना घडतात. त्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. 

लुला नगरयेथील हॉटेलवर 2019 मध्ये कारवाई
काल लुला नगर परिसरातील सातव्या मजल्यावर असलेल्या हॉटेलला आग लागली होती. त्याच हॉटेलवर 2019 मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये 82 हॉटेलला नोटीसा बजावण्यात आल्या त्यात या हॉटेलचा देखील समावेश होता.

यापूर्वी अनेक हॉटेलवर कारवाई बाकी हॉटेलचं काय?
पुण्यात अनेक इमारतींवर रुफ टॉप हॉटेल्स बघायला मिळतात. रूफटॉप पब आणि बारवर विशेष लक्ष देऊन टेरेस किंवा इमारतींच्या छतावरील बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करणं आवश्यक आहे. यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या पब आणि बारचा किंवा रुप टॉप हॉटेलचा आधीच शोध घेतला होता आणि त्यांच्या मॅनेजरला लेखी पत्र देत त्यांनी याबद्दलची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत कारवाई करण्यात आली होती. मात्र काही हॉटेलवर अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही.  महंमदवाडी, कल्याणीनगर, येरवडा, कोरेगाव पार्क, बाणेर, पाषाण, कोथरूड, खराडी आणि शहरातील इतर भागात असलेल्या प्रसिद्ध रूफटॉप पब आणि बारला यापूर्वी नोटीसा बजावल्या होत्या आणि त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली होती.

तरुणांचं आवडतं ठिकाण बनतंय धोक्याचं
पुण्यातील अनेक परिसरात रुफ टॉप हॉटेल्स आणि बार आहेत. अनेक तरुण रुफ टॉप हॉटेलला पसंती देतात. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. अनेक तरुण मंडळीचं सध्या आवडीचं ठिकाण म्हणजे अनेक रुफ टॉप हॉटेल्स आणि बार झाले आहेत. तरुणांचा आवाज आणि राडा त्यात रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने गाण्याच्या आवाजाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारी दिल्या होत्या. यावेळी पोलिसांवर देखील नागरिक मंचाने आरोप केले होते. त्यानंतर रुफटॉप हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आहे. त्यातील फक्त काहीच हॉटेल्सकडे योग्य ते परवाने असल्याचं समोर आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू
Embed widget