एक्स्प्लोर

Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?

Mumbai Pune Missing Link Accident : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या फॉर्च्युनर कारची मालवाहू टेम्पोला भीषण धडक बसल्याने झालेल्या अपघातात वाकडमधील काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या भाजीपाल्याच्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात फॉर्च्युनर कार आणि टेम्पो या दोन्ही वाहनांचा पुरता चक्काचूर झाला. या अपघातात पुण्यातील वाकडमधील काँग्रेस पक्षाचे सक्रिय युवा नेते तुषार भूमकर (Tushar Bhumkar) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य तिघे सुखरूप बचावले आहेत.

Who Was Tushar Bhumkar : कोण होते तुषार भूमकर?

तुषार भूमकर हे पुण्यातील वाकड (Wakad) परिसरातील रहिवासी होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काँग्रेस पक्षाशी संबंधित एक अभ्यासू आणि सक्रिय युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक उपक्रम, स्थानिक नागरिकांचे प्रश्न आणि काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात त्यांचा सतत पुढाकार असायचा. तरुणांमध्ये दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यातील सक्रियतेमुळे त्यांनी स्थानिक राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 

तुषार भूमकर यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा मित्रपरिवार, स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केलं. अनेकानी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अकाली निधनामुळे काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि वाकड परिसरात शोककळा पसरली आहे.

Mumbai Pune Missing Link Accident : दोन तास वाहतूक ठप्प

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे (IRB) देवदूत पथक आणि स्थानिक मदत यंत्रणांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने वळवली होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने हटवल्यानंतर एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या अपघाताचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget