एक्स्प्लोर

दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न, चालकाचं नियंत्रण सुटलं, कार थेट विहीरीत कोसळली, दोन महिलांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव कार विहिरीमध्ये कोसळल्याची घटना पारध ते वालसावंगी रस्त्यावर घडली आहे. यामध्ये विहिरीत बुडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

Jalna Accident News :  जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव कार विहिरीमध्ये कोसळल्याची घटना पारध ते वालसावंगी रस्त्यावर घडली आहे. यामध्ये 
विहिरीत बुडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी आहेत. कार मध्ये तीन प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. 

जालना जिल्ह्यातील पारध ते वालसावंगी मार्गावरील पद्मावती गावाजवळ घडली घटना

जालना जिल्ह्यातील पारध ते वालसावंगी मार्गावरील पद्मावती गावाजवळ भरधाव कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा विहिरीतील पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेला नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दुसऱ्या महिलेचा ही मृत्यू झाला. 

दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली 

सुलतानबी खान आणि अख्तर बेगम अमन खान असे मयत महिलांची नावे आहेत. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील एकाच कुटुंबातील तीन जन अंत्यविधी आटोपून परत येत होते. त्यावेळी पद्मावती गावाजवळ एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून ही कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा जागीच मृत्यू

जालन्यातील भोकरदनमध्ये महाविद्यालयाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या मलब्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर चौघेजण जखमी झाले आहेत. भोकरदन शहरातील अन्वा रोडवरील महाविद्यालयाचा सायंकाळी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर भोकरदन आणि जालना येथे उपचार सुरू असल्याची देखील माहिती आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजकुवर महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यावेळी अनेक मजूर काम करत होते. स्लॅबच्या मलब्याखाली काही मजूर अडकल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, बांधकामावरील इतर कामगार आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत मलब्याखाली अडकलेल्या मजुरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले. या दुर्घटनेत मोतीलाल रामजी मिरगे (वय 50, रा. मुठाड, ता. भोकरदन) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा नामदेव हिरे (वय 30, रा. दगडवाडी), कृष्णा विठ्ठल शिंदे (वय 40, रा. वाकडी), फारुख खा शारूख खा (वय 38, रा. दानापूर) आणि लक्ष्मण गणेश ठोंबरे (वय 30, रा. सुरंगळी) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
कदाचित ही शेवटची भेट असेल, आशीर्वाद द्यायला या; मनोज जरांगेंचं काळीज पिळवटून टाकणारं वाक्य, मराठा बांधवांना भावनिक साद
Manoj Jarange Patil and Devendra Fadnavis: मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 
जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली
मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
हौथी बंडखोरांचा लाल समुद्रातील आणखी दोन बेटांवर कब्जा; दोन्ही बाब अल-मंदेबपासून 160 किमी अंतरावर, युरोप-आशिया शॉर्टकट सागरी मार्गावर वर्चस्व वाढलं
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
महाराष्ट्र वीर सावरकरांची भूमी, सावरकर त्यांच्या काळातील सर्वात विद्वान भाषाशास्त्रज्ञ देखील होते : अमित शाह
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यातील हे दिवस आंदोलनाचे नाहीत; जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया
जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती फुगते; CM फडणवीसांनी सांगितला भाषेचा अभिमान
जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी हिंदी बोलतात तेव्हा छाती फुगते; CM फडणवीसांनी सांगितला भाषेचा अभिमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
पुण्यातील 'दगडूशेठ' बाप्पाचे मयूर रथातून आगमन; हजारोंच्या मिरवणुकीने विराजमान
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?

Embed widget