एक्स्प्लोर
ओवेसींच्या पुण्यातील सभेला अखेर परवानगी
पुणे: पुण्यात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींची यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्या पाच वाजता टिंबर मार्केटमध्ये ओवेसींची सभा होणार आहे.
यापूर्वी रस्त्यावर एमआयएमनं सभेची परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळं आज एमआयएम कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक यांची भेट घेतली आणि टींबर मार्केटमधील जागेचा प्रस्ताव दिला.
एमआयएमनं दिलेल्या जागेच्या प्रस्तावाला पोलिसांनी मान्यता दिली आहे. प्रभाग क्र. 19 मधील एमआयएम उमेदवार जुबैर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
एमआयएमनं सुरुवातीला सभेसाठी ज्या जागेची मागणी केली होती ते ठिकाण अत्यंत संवेदनशील असल्यानं पोलिसांनी तेथील सभेला परवानगी नाकारली होती. तिथं कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी सभेला नकार दिला होता. पोलिसांनी एका पत्रकाद्वारे हे स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, ओवेसींनी परवानगी नाकरल्याने नाराजी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी पुण्यात रॅली झाली, ती शांततेत पार पडली. मुंबईतही दोन सभा शांततेत झाल्या. मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर कारवाई का करत नाहीत? असा सवाल ओवेसींनी केला होता. मात्र, आता त्यांना सभेसाठी परवानगी मिळाल्यानं ओवेसी उद्या सभेत नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पुण्यासह 10 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement