भारतीय लष्कराने देशाचे संरक्षण ज्या पद्धतीने केले आहे त्यासाठी कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: X | @SachinGuptaUP

जेव्हा सीमेवर तणाव असतो, तेव्हा आपल्या जवानांचे मनोबल उंच ठेवण्याचे काम आपण सर्वसामान्य भारतीयच करतो.

Image Source: X | @SachinGuptaUP

अशा काळात प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे की ते आपल्या लष्कराच्या पाठीशी उभे राहून त्यांचे मनोबल वाढवावा.

Image Source: X | @SachinGuptaUP

उत्तर प्रदेशमधील हापुड़ येथील नागरिकांनी हे कर्तव्य मोठ्या आदराने पार पाडले आहे.

Image Source: X | @SachinGuptaUP

त्यांनी ढाब्यावर जेवायला आलेल्या जवानांचे भव्य स्वागत केले आहे.

Image Source: X | @SachinGuptaUP

जवानांची एक तुकडी हापुड़ येथील 'शिवा ढाबा' येथे जेवणासाठी थांबली होती.

Image Source: X | @SachinGuptaUP

त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात एक कल्पना आली.

Image Source: X | @SachinGuptaUP

त्यांनी ठरवलं की आपल्या लष्कराचा गौरव करायचा.

Image Source: X | @SachinGuptaUP

लगेच सर्वजण एकत्र येऊन जवानांसाठी टाळ्या वाजवू लागले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण सुरू झाली.

Image Source: X | @SachinGuptaUP

उपस्थित लोक मोठ्या आदराने जवानांशी हस्तांदोलन करत आहेत.

Image Source: X | @SachinGuptaUP

लष्करी वर्दी घालण्याचा हा खरा गौरव आहे .

Image Source: X | @SachinGuptaUP