बारामतीच्या लाटे गावात शेतकऱ्याची आत्महत्या, पाटबंधारे विभाग आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याचा आरोप
Baramati Farmer Suicide: पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे बळीराजाने व्हिडीओतून सांगितले आहे.
बारामती : बारामतीत (Baramati) शेतकऱ्याने (Farmer Suicide) व्हिडीओ (viral Video) काढून आत्महत्या केली आहे. नापिकी किंवा कर्जबाजारीपणाला कंटाळून नाही तर पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून या शेतकऱ्याने विष प्राशन करत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे बळीराजाने व्हिडीओतून सांगितले आहे.
हनुमंत सणस असं या शेतकऱ्याचं नाव असून ते लाटे तालुक्यातील रहिवासी आहेत.. पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलिसांनी त्यांना कसा त्रास दिला याची आपबिती त्यांनी आत्महत्येपूर्वी व्हिडीओतून मांडलीये. या तिन्ही विभागाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवलीये.. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.. प्रचारांचा सपाटा सुरु आहे.. मतांसाठी मतदारांपर्यंत पोहचणाऱ्या नेते मंडळींकडे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय.
काय म्हणाले आत्महत्या करण्यापूर्वी हनुमंत सणस?
आत्महत्या करण्याअगोदर केलेल्या व्हिडीओमध्ये हनुमंत सणस म्हणाले, मी हनुमंत 26 फेब्रुवारीला 2024 ला आतम्हत्येचा इशारा दिला. मला इतका त्रास दिला आहे मी खूर त्रास दिला त्याला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझे वय 70 वर्षे आहेत. माझ्या वावरात अतिक्रमण करुन मला दम देतात. माझ्या खिशात या संदर्भात चिठ्ठी लिहली आहे, वारंवार तक्रार देखील करुन पोलीसांनी उलट मला, माझ्या भावाल आणि मुलाला दम दिला. जिथे अतिक्रमण केले त्याच जागेत मी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या चिठ्ठीत ज्यांची नावे आहेत ते माझ्या आत्महत्येला जबाबदार असून त्यांना तात्काळ अटक करावी.
शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान आत्महत्या करणा-या शेतक-याच्या भावाने प्रतिक्रिया दिली असून जयवंत सणस म्हणाले, स्थानिक पोलीसांनी देखील आम्हाला त्रास दिला. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये क्षेत्र सणस यांचे क्षेत्र आहे. सणस यांच्या रानामध्ये येथील परिसरातील शेतकऱ्यांनी विनापरवाना विद्युतधारक विद्युत पंप बसवलेले असताना त्या शेतकऱ्यांना सणस यांनी काढायला सांगितले. सणस याचे रान मोकळे केले त्यानंतर हनुमंत सणस आणि त्याचा भाऊ त्या रानामध्ये जेसीबी घेऊन साफसफाई करण्यासाठी गेले असताना सणस यांना दमदाटी केली आणि खोट्या केसेस करू अशी धमकी देखील काही लोकांनी दिली. त्यानंतर वारंवार पोलीस स्टेशन मधून हनुमंत सणस आणि त्यांचे बंधू यांना फोन येऊ लागले. या भितीला घाबरून हनुमंत सणस यांनी आत्महत्या केली आहे.
हे ही वाचा :