एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनसेने पकडून दिलेले 'ते' कथित बांगलादेशी राज ठाकरेंवर खटला दाखल करणार
काही दिवासांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील सहकारनगरमध्ये एका कुटुंबाला बांगलादेशी म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या कुटुंबाने भारतीय असल्याचे पुरावे दिले आहे. मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्याविरोधात हे कुटुंब तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातून पकडून दिलेले ते तीनही नागरिक पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता या नागरिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. या सर्व प्रकाराने संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला असून याविरोधात आता कायदेशीर लढणार असल्याचा निश्चय या नागरिकांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी पुणे पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे रोशन शेख, बाख्ती सरदार आणि दिलशाद हसन यांच्या घरी शनिवारी सकाळीच मनसेचे कार्यकर्ते पोहोचले. त्यांनी तिघांना बांगलादेशी असल्याचे सांगून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान पोलिसांनी त्यांची कागदपत्रे तपासल्यानंतर हे तिघेही पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. या संपूर्ण प्रकरणांनंतर रोशन शेख यांना प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यांच्या सोसायटीतील इतर नागरिकांनीही त्यांना 'तुम्ही बांगलादेशी आहात का ?'अशी विचारणा केली. तसेच खेळायला गेलेल्या त्यांच्या मुलांनाही इतर मुलांकडून हीच विचारणा झाली. त्यामुळे संतापलेल्या रोशन शेख यांनी आता राज ठाकरे आणि पुणे पोलिसांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतल्या कुलाब्यातून 4 अफगाणी घुसखोरांना अटक, चारही जण अट्टल चोर
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पाकिस्तानी आणि बांग्लादेळी घुसखोरांविरोधात भव्य मोर्चा काढला होता. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा दावा राज यांनी आपल्या भाषणात केला होता. याच्या काही दिवसांनंतर पुण्यातील सहकारनगरमध्ये राहणार असलेल्या एका कुटुंबाच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचले. या सर्व कुटुंबाला बांगलादेशी ठरवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची मोठ्या प्रमाणात माध्यमांनी दखल घेतली होती. मात्र, पोलिसांनी तपास केला असता या कुटुंबाकडं भारताचे नागरिक असल्याचे अनेक कागदपत्रं पुराव्याच्या स्वरूपात होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार : राज ठाकरे
ठाणे, बोरिवली भागात मनसेची शोधमोहीम -
काही दिवसांपूर्वी ठाणे, बोरिवली भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली होती. ठाण्यात राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबाना पकडून मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव येथे राहणाऱ्यांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यांच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट आढळून आल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली होती.
Bangladeshi immigrants | दोन हजारात बांगलादेशी 'भारतीय' होतो; मुंबई, ठाण्यात घुसखोरांचे अड्डे | स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement