एक्स्प्लोर

Dabholkar case Verdict: डॉ. नरेंद्र दाभोलकर निकाल : 11 वर्षांचा प्रतीक्षा, 17 मिनिटात निकाल, कोर्टात काय काय घडलं?

Pune Crime News: मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकरला जन्मठेप, तिघे निर्दोष. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असे कोर्टाने सांगितले.

पुणे: राज्यातील बहुचर्चित डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला. 11 वर्षांपूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यापैकी सचिन अंदुरे (Sachin Andure) आणि शरद कळकर (Sharad Kalaskar) यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. तर दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या  वीरेंद्र तावडे (Virendra Tawde), विक्रम भावे (Vikram Bhave) आणि संजीव पुनाळेकर (Sanjiv Punalekar) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. 

सत्र न्यायालयात नेमकं काय घडलं?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर  तब्बल 11 वर्षांनी या खटल्याचा निकाल जाहीर होत असल्याने त्याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुणे सत्र न्यायालयतील विशेष सीबीआय कोर्टाचे (CBI Court) न्यायाधीश पी.पी. जाधव कोर्ट परिसरात दाखल झाले. यानंतर सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकाश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी कोर्टात दाखल झाले. आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हेदेखील यावेळी कोर्टात हजर होते. तर कोठडीत असलेल्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयात आणण्यात आले.

पाचही आरोपी न्यायालयात आल्यानंतर न्यायमूर्ती पी.पी. जाधव  यांनी कामकाजाला सुरुवात केली. सर्वप्रथम न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी संजीव पुनाळेकर यांनी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल वाचनाला सुरुवात केली. यावेळी न्यायमूर्तींनी पाच आरोपींपैकी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असणाऱ्या विरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर संजीव पुनाळेकर ज्यांच्यावर आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप होता, त्यांनाही न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. तसेच आरोपी विक्रम भावे हेदेखील निर्दोष असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले.

तर आरोपी क्रमांक दोन आणि तीन म्हणजे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना खंडपीठाने कलम 302 आणि कलम 34 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाचा कारावास होईल, असे न्यायालयाकडून निकालपत्रात नमूद करण्यात आले. 

डॉ. हमीद दाभोलकरांचे वकील काय म्हणाले?

डॉ. दाभोलकर प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर हमीद दाभोलकर यांचे वकील अभय नेवगी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अकरा वर्षानंतर निकाल आल्यानंतर वकिलांनी नाराजी व्यक्त केली. या कटाच्या सूत्रधारापर्यंत पोहोचता आले नाही, हे आपल्या तपास यंत्रणांचं अपयश आहे. समाधान फक्त एवढं आहे की, ज्यांनी दाभोलकरांना गोळ्या घातल्या त्यांना शिक्षा मिळाली. पण कटाच्या मास्टरमाईंडपर्यंत अजूनही पोहोचता आलेले नाही. या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्याबद्दल मी अगोदरच नाराजी व्यक्त केली होती.  दाभोलकर हे समाजसेवक होते, त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला. आम्ही याचे अनेक पुरावे सादर केले. आता निर्दोष सोडण्यात आलेल्या आरोपींविरोधात आम्ही वरच्या न्यायालयात धाव घेणार आहोत, असे नेवगी यांनी सांगितले. 

आणखी वाचा

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं?

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : दोघांना जन्मठेप, तीन आरोपी निर्दोष कसे ठरले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
Embed widget