एक्स्प्लोर

डॉ. तावरेचा सिनेस्टाईल प्लॅन, अल्पवयीन मुलांच्या ब्लडग्रुपशी मिळते-जुळते तीन व्यक्ती केले होते तयार; असं रचलं कट-कारस्थान

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते.

पुणे : शहरातील कल्याणी नगर पोर्शे कार अपघातात डॉ.अजय तावरेने वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे. अल्पवयीन मुलाचा ब्लड  सॅम्पल आणि अहवलात फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी अजय तावरेसह तिघांना अटक केली आहे. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलिस कोठडी (Police) सुनावली आहे. त्यामुळे, पोलिसांकडून आरोपी अजय तावरेसह इतर दोघांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या तपासात दररोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच, डॉक्टर तावरे याने सिनेस्टाईल प्लॅन रचून ब्लड सॅम्पलची अदलाबदली केल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे, पुणे (Pune accident) अपघातानंतर डॉक्टरी पेशाला काळीमा फासण्याचं कामही या डॉक्टराकडून झाल्याचं दिसून येत आहे.  

पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर 19 मे रोजी वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते.  त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बदलले. मात्र, हे ब्लड सॅम्पल कुणाचे हा प्रश्न अनुत्तरीत होता. अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने काल अहवाल सादर केला. त्यात मुलाचे रक्ताचे नमुने हे एका महिलेचे असल्याचं नमूद केल्याचं समजतं. मात्र, आता पोलीस तपासातून आणखी वेगळीच माहिती समोर येत आहे. अजय तावरेने अगदी सिनेस्टाईल प्लॅन आखल्याचं दिसून येत आहे.

मिळते-जुळते तीन व्यक्तींचे नमुने

पुण्यातील कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला अणि त्याच्यासोबतच्या त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचवण्यासाठी या तिघांचे ब्लड ग्रुप ज्यांच्याशी जुळतात अशा तीन व्यक्तींचे रक्ताचे नमुने घ्यायचं ठरलं होतं. डॉक्टर अजय तावरेने या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी तसा प्लॅनच आखला होता. त्यानंतर त्या तीन अल्पवयीन मुलांचे पालक त्यांच्या मुलांच्या ब्लड ग्रुपशी ज्यांचे रक्तगट जुळतात अशा तीन व्यक्तींना घेऊन ससुन रुग्णालयात पोहचले होते. त्यामुळे, आता पोलिस त्या तीन व्यक्ती कोण याचा शोध घेत आहेत. अजय तावरेच्या सांगण्यावरुन ब्लड ग्रुपशी मिळते जुळते सॅम्पल देण्यासाठी रुग्णालयात आलेले ते तिघे कोण होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

वडगाव शेरीतून आले होते दोघे

पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हलनुर यांना पैसे द्यायच ठरलं. त्यासाठी दोन व्यक्ती पुण्यातील वडगाव शेरी भागातून निघून ससूनच्या 40 नंबर वॉर्ड मध्ये पोहचल्या होत्या. या दोन व्यक्तींनी अतुल घटकांबळे याच्याशी संपर्क केला होता. त्यामुळे, आता या दोन व्यक्ती कोण? त्या कोणाच्या सांगण्यावरून ससून रुग्णालयात आल्या होत्,या याचा पोलिस तपास करत आहेत. म्हणजेच, रुग्णालयात आलेल्या दोन व्यक्ती आणि ब्लड सॅम्पल देण्यासाठी आलेल्या तीन अशा एकूण पाच व्यक्तींचा तपास पोलिसांकडून होत आहे. 

डॉक्टरला 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी

डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता, 5 जूनपर्यंत पोलीस (Police) कोठडी देण्यात आली आहे. अपघात व ब्लड फेरफार प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयातील (Sasoon) डॉक्टर आणि शिपायास 27 जूनला अटक केली होती. त्यानंतर, न्यायालयात हजर केले असता, सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. आता, त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात जबरदस्त युक्तिवाद केल्याचंही दिसून आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Embed widget