'डॉक्टर दिना'दिवशीच नवविवाहित डॉक्टर दाम्पत्यांची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना
किरकोळ वादातून नवविवाहित डॉक्टर पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.
पुणे : एकीकडे आज नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जात असताना पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरा-बायको झालेल्या किरकोळ वादानंतर एका नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुण्याचा वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी हा प्रकार घडला. एकीकडे डॉक्टर दिवस असल्यामुळे डॉक्टरांप्रती सन्मान व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे अशाप्रकारची दुःखद घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
निखिल शेंडकर (वय 27) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय 26) अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती-पत्नीची नावं आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी संध्याकाळी डॉ. निखिल शेंडकर हे जेव्हा क्लिनिकमध्ये होते त्यावेळी फोनवरुन त्यांची त्यांच्या पत्नीशी वादावादी झाली. त्यानंतर रात्री निखिल शेंडेकर ज्यावेळी घरी परतले त्यावेळी त्यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांनी पाहिलं. यामुळे रात्रभर ते दु:खात होते, आणि त्यातच त्यांनी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
एकीकडे डॉक्टर दिन साजरा करण्यात येत असून, त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यात येत आहे तर दुसरीकडे या नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :