पार्थ यांच्यावर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नकार; म्हणाले...
त्या विषयावर मी बोलणारच नाही, त्या विषयावर बोलून काय फायदा, असा प्रतिप्रश्न करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार या विषयावर बोलण्यास नकार दिला. ते आज पुण्यात आले होते.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांच्यावरुन पवार कुटुंबीयांमध्ये वादविवाद सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र, पार्थ पवार यांच्या विषयावर बोलण्यास नकार दिला. त्या विषयावर मी बोलणारच नाही, त्या विषयावर बोलून काय फायदा? असा प्रतिप्रश्न विचारत अजित पवार निघून गेले. आज पुण्यात पहिल्या जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झालं. यावेळी पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबईनंतर आता पुण्यातही जम्बो कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. केल्या काही दिवसांपासून जम्बो हॉस्पिटल बाबत आरोप प्रत्यारोप होत असताना आज हे उद्घाटन झालं आहे. यासोबतच महापौर मुरलीधर मोहोळ, शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
अजित पवार यांच्या बोलण्यातील मुख्य मुद्दे
राज्यातल्या घराघरात गणरायाचं आगमन झालं असल्यानं घरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण असल्याते सांगत उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन केले आहे; त्यांनी वेळ दिला त्याबद्दल पवार यांनी त्यांचे आभार मानले.
गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांना टोला 9 मार्चला राज्यातील पाहिला कोरोनाबधित पुण्यातील ड्रायव्हर आढळून आला होता. कोणालाही कोरोनाचा अंदाज आला नव्हता. धारावी कंट्रोल होणार नाही, असं काही लोक म्हणायचे मात्र आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. पुण्यातही रुग्ण वाढले आहे. काही लोक इथं त्यांचं मत देत असतात त्यांचा तो अधिकार आहे. काही लोकं दबक्या आवाजात बोलत होती, याची गरज आहे का असं विचारत होते, असे म्हणत अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
मंत्रालयात सल्लागारांचा सुळसुळाट थांबणार, राज्याचे दरमहा 60 कोटी वाचणार
आता बाहेरचेही पेशंट इथं उपचारासाठी येऊ शकतील
जम्बो कोव्हीड सेंटरमुळे आता बाहेरचेही पेशंट इथं उपचारासाठी येऊ शकतील. या हॉस्पिटलचा उपयोग फक्त पुणेकरांना नाही, आजूबाजूच्या रुग्णांना देखील होणार आहे. ऑक्सिजन, आयसीआयुची आणि डॉक्टरांची मोठी टीम या ठिकाणी असेल. परिणामी रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. जास्त बिलं आकारली जात होती, ती कमी कशी येतील याबाबत लक्ष दिलं जात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ई पास बाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून गृहमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र देशाला डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेत असल्याचे पवार यांनी सांगितले. अरे कशाचा दाऊद दाऊद करत बसला. काहीतरी कोणीतरी टीव्हीला दाखवतं. काल दाखवलं दाऊद पाकिस्तानमध्ये आज दाखवलं दाऊद आमच्याकडे नाही. तो एका दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. कारण, वातावरण खराब करण्याचं काम त्या टोळीने केलं आहे. केंद्र आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि त्यावर निर्णय घेतील. ते सक्षम आहे, आम्ही त्यात वक्तव्य करणं बरोबर नाही, असेही ते म्हणाले.
E-Pass | ई-पासबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार