Bomb Threat: पुण्याकडे येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन, तपास सुरु
Delhi-Pune SpiceJet Flight: दिल्लीवरुन पुण्याला येणाऱ्या स्पाइसजेट विमानात बॉम्ब असल्याचा (Bomb Threat) दावा करणारा फोन आला.
Delhi-Pune SpiceJet Flight: दिल्लीवरुन पुण्याला येणाऱ्या स्पाइसजेट विमानात बॉम्ब असल्याचा (Bomb Threat) दावा करणारा फोन आला. त्यानंतर दिल्ली विमानतळावर विमानाची झाडाझडती घेण्यात येत आहे. सायंकाळी साडेसहा वाजता दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरुन (Delhi IGI Airport) विमान पुण्यासाठी रवाना होणार होतं. पण त्याचवेळी विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला. धमकीच्या फोननंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी विमानाचं बोर्डिंग तात्काळ रोखलं अन् बॉम्बशोधक पथकाला पाचारण केलं. पुण्याकडे येणाऱ्या विमानाची झाडाझडती घेण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, दिल्लीवरुन पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता. या धमकीच्या फोननंतर सीआयएसएप आणि दिल्ली पोलीस अलर्ट झालं आहे. दिल्ली विमानतळावर फ्लाइटची कसून तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत विमानात काहीही संशयास्पद मिळालेलं नाही. पण एसओपीनुसार सुरक्षा ड्रिलचं पालन करण्यता येत आहे. पॅरामिलिट्री फोर्स CISF आणि दिल्ली पोलीस स्टँडबायवर आहे.
#UPDATE | Bomb call on Delhi-Pune Spicejet flight at IGI Airport | Delhi Police say, "So far nothing suspicious has been found but security drill will be followed as per SOP."
— ANI (@ANI) January 12, 2023
#BreakingNews | Following the bomb scare, Delhi-Pune SpiceJet flight being inspected at Delhi's IGI Airport.#DelhiAirport #SpiceJet #Delhi #Pune pic.twitter.com/ZVzkg3RFKJ
— BHARAT DETAILS 🗞️ (@bharatdetails) January 12, 2023
सोमवारीही असाच प्रकार समोर आला होता -
याआधी सोमवारी 9 जानेवारी रोजी विमानत बॉम्ब असल्याचा फोन आल्यानंतर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होतं. मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन आला होता, त्यामुळे जामनगर विमानतळावर फ्लाइटचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. त्या फ्लाइटची झडती घेतल्यानंतर काहीही संशायस्पद आढळलं नव्हतं. त्यानंतर मंगळवारी दुपारी विमान गुजरातवरुन गोव्यासाठी रवाना झालं होतं. या विमानात 236 प्रवाशी होतो.
Call received regarding bomb in SpiceJet's Delhi-Pune flight before take off, plane being searched: Delhi Police
— Press Trust of India (@PTI_News) January 12, 2023
आणखी वाचा:
Moscow-Goa Chartered Flight: गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी, एमर्जन्सी लँडिंग