Indapur Crime : इंदापुरात भीमा नदीत आढळला पाच तुकडे केलेला अन् शीर नसलेला मृतदेह; घटनेने खळबळ
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे भीमा नदी पात्रात 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करुन त्याचे पाच तुकडे करत शिर विरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत आढळून आला आहे.
Indapur Crime : एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या (Murder) करुन त्यांचे मृतदेह (Crime) नदीत फेकून दिल्याची दौंड तालुक्यातील घटना ताजी असतानाच इंदापूर (Indapur) तालुक्यातील तक्रारवाडी येथे भीमा नदी पात्रात 30 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करुन त्याचे पाच तुकडे करत शीरविरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत आढळून आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून या गूढ आणि तेवढ्याच रहस्यमय क्रूर खुनाचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. भीमा नदीत मृतदेह सापडण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी भीमा नदीत सलग सहा दिवसांत सात मृतदेह आढळले होते. त्यानंतर मोठी घटना समोर आली होती. हे सगळेच मृतदेह एकाच कुटुंबातील आहे, असं पोलीस तपासात पुढे आलं होतं. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला होता. मोहन पवार आणि त्यांचे कुटुंबीय 17 जानेवारी रोजी भीमा नदीजवळ आल्यानंतर धनंजय याच्या घरच्यांनी त्यांची वाट अडवली होती. त्यांनी मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी आणि जावयाला बेशुद्ध करुन त्यांच्यासोबत असलेल्या तीन मुलांनासह नदीत फेकलं होतं. पाण्यात बुडून या सात जणांचा मृत्यू झाला होता. दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा शीर नसलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
क्रूरपणे केली हत्या
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे भीमा नदी पात्रात 30 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. मागच्या एकाच कुटुंबातील सात जणांच्या हत्येच्या घटनेनंतर ही पुन्हा क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतदेहाचं शीर धडापासून वेगळं करुन हत्या केली आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
एकाच महिन्यातील दुसऱ्या घटनेने पोलीस सतर्क
काही दिवसांच्या अंतरानेच ही घटना समोर आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून या मृतदेहासंदर्भात चौकशी सुरु आहे. नेमका मृतदेह कोणाचा आहे आणि हत्या का केली? याची पोलीस चौकशी करत आहेत. येत्या काळात या घटनेचं गूढ समोर येईल आणि घटनेचं चित्र स्पष्ट होईल.