Pune Crime News: अश्लील व्हिडिओ दाखवला, जिवे मारण्याची धमकी देत 10 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना
Pune Crime News: आरोपीने पीडित दहा वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केल्याचंही आईने सांगितलं आहे. तसेच तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
![Pune Crime News: अश्लील व्हिडिओ दाखवला, जिवे मारण्याची धमकी देत 10 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना Crime News 10-year-old girl was sexually assaulted while threatening to kill her an incident in Pune Pune Crime News: अश्लील व्हिडिओ दाखवला, जिवे मारण्याची धमकी देत 10 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील संतापजनक घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/20/0475947c28f9b43a36aae671b4365dc11724131043936954_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: मागील काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुलीसंबधी आणि महिलांसंबधी होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहेत. अशातच पुण्यात अश्लील व्हिडिओ दाखवून आणि जिवे मारण्याची धमकी देत दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.अनिरुद्ध सदाशिव डबीर (वय ४२, रा. अनमोल रेसिडेन्सी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात (Pune Crime News)फिर्याद दिली होती. आरोपीने पीडित दहा वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केल्याचंही आईने सांगितलं आहे. तसेच तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रिक्षा चालकाने केला शाळकरी मुलीचा विनयभंग
पुण्यात रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग (Pune Crime News) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिक्षा चालवत असताना पुढे आरशात पाहत होता त्यावेळी तू मला आवडते, पळून जाऊन लग्न करू म्हणत रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे.
तू मला आवडते. आपण पळून जाऊन लग्न करू, असे म्हणत रिक्षाचालकाने शाळकरी मुलीचा विनयभंग (Pune Crime News) केल्याचा प्रकार समोर आला, या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना पर्वती परिसरातील जनता वसाहत परिसरात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालका विरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या आईने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
'तू माझ्याकडे बघत जा...', शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
पुण्यातील हडपसर भागात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग (Pune Crime News) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) त्याचबरोबर विनयभंग (Pune Crime News) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) केला आहे.
'तू मला आवडतेस' शाळेतील स्कूल व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीला इंस्टाग्रामवर मेसेज
शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला 'तू मला आवडतेस' असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप (Pune Crime News) व्यक्त केला आहे, आम्ही तुमच्या विश्वासावर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो आणि तुम्ही अशी कृत्ये करता असं म्हणत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. तर स्कूल व्हॅन चालकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)