(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Police Reward List : गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयाचं बक्षीस, पुणे पोलिसांच्या रिवॉर्डची वादग्रस्त यादी व्हायरल
Pune Police : पुण्यात पोलिस उपायुक्तांच्या ड्रायव्हरला 21 हजारांचं बक्षीस आणि गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
Pune Police Reward List : पुणे पोलिसांची (Pune police) रिवॉर्ड (Pune Police Reward List) यादी चर्चेचा विषय बनली आहे. पोलिस उपायुक्तांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 21 हजारांचं बक्षीस आणि गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झाल्याने ही यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणे पोलिसांच्या उत्तम कामगिरीसाठी पोलिस आयुक्तांकडून देण्यात येणारे रिवॅार्ड जाहीर करण्यात आले आहेत. उत्तम कामगिरीसाठी हे रिवॅार्ड देण्यात येतात. मात्र सध्या परिमंडळ 3 च्या आयुक्तांनी दिलेल्या रिवॅार्डची एक वादग्रस्त यादी सोशल मिडीया व्हायरल झाली आहे. या यादीमुळे पोलिसांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
पोलिस उपायुक्तांच्या वाहन चालकाला 21 हजार रुपयांचं रिवॉर्ड जाहीर करण्यात आलं आहे. तर गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पोलिसांना फक्त 100 रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलिस आयुक्तालयात 8 तारखेला ही जाहीर झाली. यात प्रत्येक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्या परिमंडळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणून त्यांना रिवॅार्ड अर्थात बक्षीस जाहीर केलं आहे. या यादीत बक्षीसाची रक्कम, कामगिरी आणि नावं आहेत. मात्र ही यादी बक्षिसाच्या रकमेवरुन वादग्रस्त ठरत आहे.
उपायुक्तांच्या ड्रायव्हरला 21 हजारांचं बक्षीस
मात्र यंदाच्या गॅझेट लिस्टमध्ये परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे ड्रायव्हर आणि गार्ड म्हणून नियुक्त असलेल्या चार पोलिस शिपायांना तब्बल 21 हजार रूपये प्रत्येकी इतके रिवॅार्ड देण्यात आले आहेत. गायकवाड यांना वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी त्यांना हा रिवार्ड जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे परिमंडळ तीनच्या उपायुक्त मीटींगला वेळेवर पोहोचवल म्हणून हजारो रूपयाची बक्षीसांची खैरात करत आहेत. मात्र गंभीर गुन्ह्यामधले गुन्हेगार जीवावर उदार होऊन पकडून आणणाऱ्यांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 100 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
जीवावर बेतून गुन्ह्याचा छडा लावायची किंमत फक्त 100 रुपये
पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मोठ्या टोळ्यादेखील सक्रिय आहे. या टोळ्यांना आळा घालण्यासाठी पुण्यातील गुन्हे शाखेचे प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी जीवापार प्रयत्न करत आहे. अनेकदा माहिती मिळाल्यावर रात्रीबेरात्री गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी रवाना होतात. तर अनेकदा तातडीने सापळा रचून गुन्हेगाराला जेरबंद करण्यात यश मिळवतात. चोरी, खून, अपहरण या प्रकरणातील कोयते, चाकू सुरी यांचा शोध घेण्यासाठी जीवावर बेतून कार्यरत असतात. याच पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र बक्षिस म्हणून मात्र 100 रुपये जाहीर करण्यात आले आहे.