एक्स्प्लोर
Advertisement
जुन्या नोटा बदलण्यासाठी नगरहून पुण्यात, काँग्रेस नगरसेवकासह 5 जण ताब्यात
तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेले नगर जिल्ह्यातील संगमनेरचे काँग्रेस नगरसेवक गजेंद्र बजाबा अभंग यांच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे : नोटबंदी होऊन एक वर्ष उलटले तरीही नोटा बदलून देण्याचे प्रकार सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेले नगर जिल्ह्यातील संगमनेरचे काँग्रेस नगरसेवक गजेंद्र बजाबा अभंग यांच्यासह पाच जणांना खडक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
काल रात्री गस्त घालत असताना आरोपींकडे जुन्या नोटांच्या बॅग सापडल्या. रविवार पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली.
गजेंद्र अभंग, विजय शिंदे, सुरज जगताप, आदित्य चव्हाण, नवनाथ भांडागाळे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी बंदिवान मंदिराजवळ रविवार पेठ येथे आले असता गस्तीवर असलेल्या पोलिसांना शंका आली. त्यामुळे खडक पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे जुन्या नोटांच्या बॅग सापडल्या.
यामध्ये एक हजार रुपयांच्या 11 हजार 900 नोटा आणि 500 रुपयांच्या 36 हजार नोटा सापडल्या. याप्रकरणी खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या नोटा कोणाला बदलून देणार होते. एवढी मोठी ही रक्कम कुठून आणली होती. याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement