(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : रस्ता रुंदीकरणासाठी पुण्यात 300 झाडांची कत्तल; पर्यावरणप्रेमी संतापले!
पुणे : पुणे महानगरपालिकेकडून साधारण 300 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. रस्त्यांचं रुंदीकरण आणि पार्किंग उपलब्ध करुन देण्यासाठी या झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेकडून (PMC) साधारण 300 झाडांची कत्तल करण्यात (Pune News) येणार आहे. रस्त्यांचं रुंदीकरण आणि पार्किंग उपलब्ध करुन (tree) देण्यासाठी या झाडांची कत्तल करण्यात येत असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र याच झाडांच्या कत्तलीला आता पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णययाविरोधात पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.
पुण्यातील बाणेर रस्त्यावर सध्या रहदारी चांगलीच वाढली आहे. त्यात या परिसरात प्रदुषणामुळे श्वास घेणं कठीण होत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यातच आता याच रस्त्यावरील 80 झाडे रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण यासाठी तोडली जात आहेत. मेट्रो आणि उड्डाणपूल यांचे कामही याच रस्त्यावर सुरु आहेत. त्यामुळे साधारण 15 वर्ष जुनी झाडे तोडण्यात येत आहे. औंध बाणेरसह इतर रस्त्यांवरील झाडे देखील कापण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेने औंध बाणेर रस्त्यावर 80 झाडं तोडण्याचा घाट घातला आहे. कॉमन वेल्थ गेमच्या वेळी या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलं होतं. सध्या पुण्यातील औंध बाणेर परिसरात झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने रस्तारुंदीकरणाच्या नावाखाली आणि पार्किंगच्या नावाखाली ही झालं तोडली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असल्याचं पर्यावरणप्रेमींनी म्हटलं आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील AQI ढासळत असताना महापालिकेकडून झाडं वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नसल्याचं दिसत आहे. महापालिकेकडून या संदर्भात कोणतीही पूर्वमाहिती न दिल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. रोडमॅपमध्ये नवे झाडं लावण्यासाठी कोणतीही जागा ठेवण्यात आली नाही आहेत. पर्याय उपलब्ध असताना झाडांची कत्तल केली पाहिजे अन्यथा झाडं तोडणं म्हणजे पर्यावरणाचं नुकसान असल्याचंदेखील पर्यावरण प्रेमींनी स्पष्ट केलं आहे.
महापालिकेची नेमकी कामं कोणती?
-पुणे महानगरपालिका हद्दीत वृक्षारोपण करणे.
- रस्ता दुभाजक आणि रस्त्याच्या कडेने वृक्ष लागवड करणे.
-दर 5 वर्षांनी शहरातील वृक्षांची वृक्षगणना करणे.
-बांधकामास अडथळा करणार्या वृक्षांच्या फांद्या छाटण्यास परवानगी देणे.
-धोकादायक वृक्ष तोडण्यास परवानगी देणे.
- मोकळ्या जागा, कॅनॉल, नाले, नदी व तलाव याठिकाणी वृक्ष लागवड करून सुशोभिकरण करणे.
मात्र महापालिकेकडूनच झाडं तोडण्यात येत असल्याने आता पर्यावरणप्रेमी चांगलेच संतापलेले दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-
- Pune Amitesh Kumar : मॅचफिक्सिंगचा भांडाफोड, नागपूरची गुन्हेगारी रोखली, आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांच्यासमोर कोणती आव्हानं?
- अल्पवयीन मुलीवर संचालकाचा अत्याचार, पिंपरीत घडली धक्कादायक घटना