एक्स्प्लोर

वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फुटू शकते, 'स्वराज्य'चा इशारा, पुण्यात सर्किट हाऊसबाहेर मराठा वि. ओबीसी कार्यकर्ते आक्रमक

आमच्या आंदोलनाला नख लावण्याचे काम करू नका. वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते, असा इशारा धनंजय जाधव यांनी या वेळी दिला आहे. 

पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्या पुण्यातील शासकीय निवासस्थानी मोठा राडा पाहायला मिळाला . स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीस धनंजय जाधव (Dhananjay Jadhav)  यांनी शासकीय विश्रामगृहात जाऊन छगन भुजबळांना थेट धमकी दिली आहे. आमच्या आंदोलनाला नख लावण्याचे काम करू नका असे धनंजय जाधव म्हणाले. वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते, असा इशारा धनंजय जाधव यांनी या वेळी दिला आहे. 

राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. राज्यात ओबीसी मराठा वाद लागू नये अशी भूमीका  छत्रपती संभाजीराजे यांची आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. भुजबळ किंवा तायवाडे चिथावणीखोर वक्तव्ये करतात, मराठा समाजातील नेत्यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते. आम्ही फक्त इशारा दिला आहे. आज इशारा दिला आहे कृती करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही. परंतु राज्यात ओबीसी वि. मराठा वाद लागू नये, अशी आमची भूमिका आहे म्हणून आम्ही शांत आहे,  असे धनंजय जाधव म्हणाले. 

नेमकं झाले काय?

पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. मात्र यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी छगन भुजबळ यांच्या गाडी जवळ येऊन त्यांना चॅलेंज दिलं. धनंजय जाधव यांनी त्यांची गाडी छगन भुजबळ यांच्या गाडी शेजारी लावली व दोन्ही गाड्यांमधील अंतर दाखवलं. गाडी फोडण्यासाठी काही वेळ लागणार नाही असा इशाराही दिला. खुले चॅलेंज देऊन भुजबळांना व ओबीसी नेत्यांना धनंजय जाधव यांनी इशारा दिला. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधवला आतमध्ये कसं सोडलं? असा संतप्त सवाल ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना उपस्थित केला. जाधव यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर काढले यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले. 

दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,  भुजबळ समर्थक आक्रमक

या घटननेनंतर भुजबळांचे समर्थक देखील आक्रमक झाले. छगन भुजबळाच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली त्यानंर काही वेळ परिसरात  तणावाचे वातावरण निर्माण झाले. भुजबळांची गाडी फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांचा ओबीसी परिषदेच्या वतीने निषेध केला. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका भुजबळ समर्थकांनी घेतली आहे.

छगन भुजबळ सबुरीने घ्या अन्यथा...

छगन भुजबळ यांनी जरा सबुरीने घ्यावं. अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वराज्य संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. छगन भुजबळांच्या या भूमिकेला मराठा समाज भुजबळांना कडाडून विरोध करत आहे.

पाहा व्हिडीओ :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget