Chhagan Bhujbal on Manoj Jarange : 27 जानेवारीला गुलाल उधळला, रात्री डिजे लावला मग पुन्हा उपोषण कशाला? छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना सवाल
Chhagan Bhujbal, Pune : 27 जानेवारीला गुलाल उधळला. रात्री डिजे लावला मग आता उपोषण का करताय? असा सवाल मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांना केला आहे. मनोज जरांगे मुंबईत दाखल झाल्यानंतर सरकारकडून अधिसूचना काढण्यात आली होती.
Chhagan Bhujbal, Pune : 27 जानेवारीला गुलाल उधळला. रात्री डिजे लावला मग आता उपोषण का करताय? असा सवाल मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांना केला आहे. मनोज जरांगे मुंबईत दाखल झाल्यानंतर सरकारकडून अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानंतर मराठा समाज आणि मनोज जरांगे जल्लोष केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यावर छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
सगेसोयरेची व्याप्ती वाढवून नका : भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले, एनकेन प्रकारे ओबीसीमध्ये घुसतात सर्व मार्गांनी आरक्षण हवे. ओबीसींचे आरक्षण वाचवणे हे माझं लक्ष आहे. सध्या ओबीसी नोंदींचे फॉर्म गोळा करण्यासाठी गर्दी होत आहे. मनोज जरांगेंना श्रेय घ्यायचय. आरक्षण टिकावे याला आमचा पाठिंबा आहे. श्रेय मिळावं म्हणून उपोषण १५ तारखेची वाट बघावी लागणार आहे. जरांगेंनी आम्हाला आईवरुन शिव्या दिल्यात. मात्र, एका अधिवेशनात सर्व विषय मार्गी लागतील.
'मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार'
मनोज जरांगे पाटलांना आरक्षणाचे श्रेय घ्यायचे आहे. त्यामुळे ते पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत. आम्ही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. काही दिवसांत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. मात्र, ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल, असेही छगन भुजबळ यांनी नमूद केले. पुन्हा उपोषणाला बसायचं होतं तर मग वाशीमध्ये जल्लोष का केला गुलाल का उधळला ? असा सवालही भुजबळ यांनी जरांगेंना यावेळी बोलताना केलाय.
हरकती घेणाऱ्या लोकांना मंत्रालयात अनेक अडचणी; भुजबळांचा दावा
हरकती आणि सूचना नोंदवण्यास येणाऱ्या लोकांना मंत्रालयात अनेक अडचणी येत आहेत, असा दावाही भुजबळ यांनी केलाय. त्यासंदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. व्यवस्था सुरळीत होईल अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही मंत्री भुजबळ यांनी दिला.
प्रफु्ल्ल पटेलांच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले?
राजकारणात डाव प्रती डाव असतातच. प्रफुल पटेल यांच्यावरती अपात्रतेची याचिका आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे. ती जागाही आमचीच आहे. त्या जागेवर जेव्हा निवडणूक होईल तिथे आम्ही आमचा उमेदवार देऊ, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या