एक्स्प्लोर

Chandrakant Patil : शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कुणाला घाबरत नाही, ही तर झुंडशाही, हिंमत असेल तर समोरुन या...

चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी कुणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोरुन या, असं म्हटलं आहे. 

Chandrakant Patil News: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil in Pune) हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मी कुणाला घाबरत नाही, हिंमत असेल तर समोरुन या, असं म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. अशा प्रकारे पराचा कावळा करणं, दिलगिरी व्यक्त केली असतानाही असा भ्याडपणे हल्ला करणं चुकीचं आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सगळं पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असं ते म्हणाले. 

'गिरणी कामगारांचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं सरंजामी लोकांना झेपत नाही'

चंद्रकांत पाटील म्हणाले की,  ही झुंडशाही आहे. ही झुंडशाही महाराष्ट्र शासन सहन करणार नाही. याचं जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाहतील. आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली छुट दिली असती तर काय झालं असतं. मात्र ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दाने टक्कर देता येते. मी काल आणि आजही दिलगिरी व्यक्त केली. गिरणी कामगारांचा मुलगा या स्टेजपर्यंत जाणं सरंजामी लोकांना झेपत नाही. त्यामुळं हे भ्याड हल्ले चालले आहेत. उद्यापासून पोलिस प्रोटेक्शनही नसेल, हिंमत असेल तर समोर या, असंही पाटील म्हणाले.

'मी सर्व कार्यक्रमाला जाणार, बघू कोण काय करतंय'

पाटील म्हणाले की,  हे चुकीचे पायंडे पडलेले आहेत. पोलिसांना दोष देण्याचं कारण नाही. पोलिसांनी कुणाकुणावर लक्ष द्यायचं. कार्यकर्ता कोण आणि बदमाश कोण हे कळणार कसं. देवेंद्रजींनाही मी सांगितलं आहे की, कुणावरही कारवाई करु नका. मी सर्व कार्यक्रमाला जाणार आहे. बघू कोण काय करतंय, या समोर. ही झुंडशाही आहे, लोकशाही नाही. हा बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. पैठणमध्ये जे बोललो त्याचा विपर्यास केला आहे. मात्र पराचा कावळा केला गेला, लोकसहभागातून शाळा उभारल्या असं म्हणण्याऐवजी मी ग्रामीण भाषेत बोललो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायदा हातात घेऊ नका

कार्यकर्त्यांना मी सांगतो की आपापल्या ठिकाणी परत जा. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायदा हातात घेऊ नका. काही कार्यकर्ते रडले मी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.  मी लढणार माणूस आहे, रडणारा नाही. आता विरोधी पक्षांनी बोलावं की ही झुंडशाही चालणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे यांनी या घटनेची निंदा करावी, असं देखील चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय झालं...
चंद्रकांत पाटील हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा शुभारंभ करायला आले. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वी एका व्यक्तिनं चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. एका पदाधिकाऱ्याच्या घरातून ते कार्यक्रमस्थळी निघाले होते. तेव्हाच एकाने थेट त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली अन् त्यांनी महात्मा फुलेंच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी शाई फेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget