एक्स्प्लोर

IAS Pooja Khedkar: महाविद्यालयात प्रवेश घेताना पूजा खेडकर फीट असल्याचं सर्टिफिकेट; सर्व कागदपत्रे ABP माझाच्या हाती

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरने एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केलं होतं. तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं.

IAS Pooja Khedkar: आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केलं होतं. तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्याचबरोबर त्यावेळी तिचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील तिने ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेताना तिचं नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद करण्यात आलं होतं. या सगळ्याबाबत या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ अरविंद भोरे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

त्यानंतर आता पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) आयएएस हाेण्यासाठी यूपीएससीकडे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. दिव्यांग काेट्यातून तिला नाेकरीही मिळाली. मात्र आता वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही. मग यूपीएससीच्या वेळीच तिला दिव्यांगपणा आला का असा? प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यावेळी खेडकरला सीईटीमध्ये २०० पैकी १४६ गुण मिळाले होते. दरम्यान या गोष्टींवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

त्याचबरोबर परिक्षेनंतर पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आयएएसपदी नियुक्ती देखील झाली. पुण्यात तिचा प्रोबेशन कालावधी सुरू असतानाच तिने आपल्या खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा लावला. त्याचबरोबर तिने आपल्या त्याच गाडीवर ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्डही लावला होता. याशिवाय प्रोबेशन काळ सुरू असताना तिने सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर, सरकारी कर्मचारी अशा गोष्टींची मागणी केली होती. यामुळे तिच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आलेली होती. त्यानंतर पूजा खेडकरची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. हे प्रकरण चर्चेत असतानाच पूजा खेडकरच्या सोबतच तिच्या कुटुंबियांचे देखील रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

महाविद्यालयाच्या कागदपत्रावरून पूजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात २००७ मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला हाेता. त्यावेळी सीईटीद्वारे तिला प्रवेश मिळाला हाेता. त्यावेळी देखील तिने एनटीसी-३ या प्रवर्गातून प्रवेश घेतला होता, तिचे नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis:भोंग्याला सरसकट परवानगी नाही, उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द :देवेंद्र फडणवीसJitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका?  : जितेंद्र आव्हाडMaharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णयBhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
बीडच्या तहसीलदारांना धमकी, व्हायरल ऑडिओ क्लिवर आमदार संदीप क्षीरसागरांची पहिली प्रतिक्रिया
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
राजकारण्यांचा नावडता, अधिकारी चळाचळा कापतात त्या तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
सरकार बीडमध्ये तुकाराम मुंढेंची नियुक्ती करणार का? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
Guillain Barre Syndrome : नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Embed widget